`ऐश्वर्यासोबत काम करताना मला वाईट वाटलं`; अमिताभ बच्चन यांनी 20 वर्षांनंतर बोलून दाखवलं
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. एका सिनेमात अभिनेता विवेक ओबेरॉय देखील होता. या सिनेमाबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं आहे.
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, या दोघांमध्ये काही आलबेल नसल्याच सांगण्यात येत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच 2007 मध्ये लग्न झालं आहे. अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. 2004 मध्ये 'क्यों हो गया ना' मध्ये या सिनेमात विवेक ओबेरॉय ऐश्वर्या एकमेकांच्या अपोझिट रोलमध्ये होते. या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याच्या काकाची भूमिका साकारली होती.
अमिताभ यांनी सांगितलं की, सिनेमात कॅमियो रोल केल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं होतं. अमिताभ यांनी सांगितलं की, हा फक्त कॅमियो होता. मी एका अनाथालयाच्या प्रमुखाच्या भूमिकेत होता. मी ऐश्वर्याच्या काकाची भूमिका साकारली होती. हा रोल मला आवडला नव्हता पण या रोलमधील एक गोष्ट खास म्हणजे मुलांसोबत काम करायला मिळालं. मिस्टर नटरवलालनंतर हा दुसरा रोल होत जो मी साकारला.
ऐश्वर्याबद्दल अमिताभ म्हणाले,' ती खूप सुंदर आहे. मला आणि जयाला चित्रपटात ऐश्वर्या खूप छान वाटली. मला वाटते की,'ऐश्वर्याने आता अधिक परिपक्व भूमिका केल्या पाहिजेत.'
ऐश्वर्यासोबत काम कसं होतं?
याशिवाय, जेव्हा अमिताभ यांना विचारले गेले की ऐश्वर्या त्यांच्या आवडत्या सहकलाकारांपैकी एक आहे, तेव्हा बिग बी म्हणाले होते - तुम्हाला माझ्यावर टीका करण्याची गरज नाही कारण मला ऐश्वर्या आवडते. माझे सर्वांशी चांगले जमते. मी ज्या लोकांशी जुळत नाही त्यांच्यासोबत मी काम करत नाही. त्यांच्यासोबत काम करताना आनंद, मस्ती आणि चांगले वातावरण असते. याशिवाय, अमिताभ विवेकबद्दल म्हणाले होते. ते 20 दिवस कुर्गमध्ये एकत्र राहिले आणि त्यानंतर त्यांचे काम संपले.