कर्जबाजारी अमिताभ, यांची धीरुभाई अंबानी यांनी उद्योगपतींच्या बैठकीत पाट का थोपटली...
अमिताभ बच्चन यांचा एक काळ असा आला होता की, सरकार घराला सील करत होते आणि बँक बॅलन्सही शून्यावर आला होता.
मुंबई : 1973मध्ये जेव्हा अमिताभ बच्चन यांचा 'जंजीर' हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा या चित्रपटामधून त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांचे यश शिगेला पोहचलं. पण 90च्या दशकापर्यंत असा काळ आला की, त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. सरकार घराला सील करत होते आणि बँक बॅलन्सही शून्यावर आला होता. रिलायन्स कंपनीच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांनी हा खुलासा केला.
या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओही कायम शेअर केले जातात. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी त्या दिवसातील आठवणी शेअर केल्या आहेत जेव्हा ते कंगाल झाले होते आणि त्या काळात धीरूभाई अंबानी यांनी त्यांना कशी मदत केली होती.
त्यांचा वाईट टप्पा आठवताना अमिताभ म्हणाले, ''एक वेळ अशी आली जेव्हा मी कंगाल झालो होतो. माझी कंपनी लॉसमध्ये गेली होती. कोट्यवधी रुपयांचे कर्ज चढलं. माझे पर्सनल बँक बॅलन्स शून्यावर गेला होता. सर्व बाजूंनी कमाई बंद करण्यात आली होती आणि सरकारच्या वतीने घरी छापे टाकण्यात आले.''
याचा खूप वाईट वेळ चालू आहे, त्याला थोडे पैसे द्या…
बिग बी पुढे म्हणाले, ''धीरूभाईंना याची माहिती मिळाली. त्यांनी आपला धाकटा मुलगा आणि माझा मित्र अनिल अंबानी यांना सांगितलं की, आता याची खराब वेळ चालू आहे. त्याला हे थोडे पैसे द्या अनिल आले मला भेटायला आले आणि मला हे सगळं सांगितलं. त्यांना मला जेवढे पैसे द्यायचे होते तेवढे घेवून माझे सगळे प्रश्न संपले असते.
मी त्याच्या उदारपणाबद्दल उत्साही होतो,पण मला वाटलं की, कदाचित मी त्याचे उपकार स्वीकारू शकणार नाही. देवाचा आशीर्वाद आणि वेळ बदलली. काम सुरू झालं आणि मग हळूहळू मी माझं सगळं कर्ज फेडत गेलो"
अमिताभ यांनी या कार्यक्रमात तो ही किस्सा शेअर केला, धीरूभाई अंबानी यांच्या घरी पार्टीला गेले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या बिझनेस इंडस्ट्रीमधील लोकांशी ओळख कशी करुन दिली. अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, “मला संध्याकाळी धीरूभाईंच्या पार्टीमध्ये आमंत्रित केलं होतं.
धीरूभाई एका बाजूला आपल्या कॉर्पोरेट इंडस्ट्रीमधील दिग्गजांशी बोलत होते. तेव्हा त्यांची नजर माझ्यावर पडली तेव्हा त्यांनी मला बोलावलं. ते म्हणाले, इकडे या आणि माझ्याबरोबर बसा. मला खूप विचित्र वाटलं. मी त्यांना सांगितलं की नाही, मी तिथे माझ्या मित्रांसह बसलो आहे, मी तिथे ठीक आहे."
हा मुलगा पडला होता, मात्र स्वतःच्या बळावर पुन्हा उभा राहिला…
"यानंतर, खूप भावनिक होवून बीग बी पुढे म्हणाले, नंतर त्यांनी दिग्गजांच्या मिटींगंध्ये सांगितलं की, हा मुलगा खाली पडला होता, मात्र स्वतःच्या बळावर पुन्हा उभा राहिला आहे, मी त्याचा आदर करतो." त्यांचे हे वर्तन आणि त्यांचे हे शब्द माझ्यासाठी, हजारो पट जास्त होते."