मुंबई  : ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक भूमिका साकारल्या आहेत. त्या स्वत: एकेकाळी 'वॅम्प' भूमिका साकारण्यासाठी ओळखल्या जात असत. मात्र, जेव्हा त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळ्या प्रकारची भिती बसली होती. त्यांना स्टार्सच्या पात्रांमुळे भीती वाटायची. असाच एका किस्सा त्यांनी 'द कपिल शर्मा शो' मध्ये शेअर केला होता. त्या म्हणाल्या की, त्यांना फक्त प्राण साहेबांसोबत एकटं प्रवास करायचा नव्हता तर त्यांना त्याच हॉटेलमध्येही एकत्र रहावं लागलं. यामुळे त्यांना अशी भीती वाटली की, पडद्यावर प्राण साहेब जशी भूमिका साकारतात तसंच खऱ्या आयुष्यातही ते तसंच वागतील. ते आपल्यावर बलात्कार करतील अशी भिती त्यांना सतत वाटू लागली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाँगकाँगमध्ये शूटिंग होणार होतं
अरुणा इराणी यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितले की, 'प्राण साहेब यांच्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिका पाहून त्यांला भीती वाटली. अरुणा यांना त्यांच्याबरोबर एकाच चित्रपटात कामही करणं भितीदायक वाटू लागलं.


जेव्हा त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करायला सुरूवात केली. तेव्हा त्यांना 'जोहर मेहमूद इन हाँगकाँग' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी हाँगकाँगला जाण्यास सांगण्यात आलं.


अरुणा यांनी आधी नकार दिला आणि मग आईला आपल्याबरोबर येण्याची परवानगी द्यावी अशी अट त्यांनी दिग्दर्शकाकडे ठेवली.  मग दिग्दर्शक म्हणाले तुम्हाला एकटीलाच या शूटसाठी जावं लागेल. चित्रपटातून काढून टाकण्याच्या भीतीने अरुणा यांनी ही अट मान्य केली.


दोघेही एकाच हॉटेलमध्ये थांबले
अरुणा म्हणाल्या, 'हाँगकाँगमध्ये बरेच दिवस शुटिंग सुरु होतं. माझा शूटिंगचा भाग पूर्ण झाला होता. मलाही परत मुंबईला जायचं होतं. तर दुसरीकडे प्राण साहेबांच्या भागाचं चित्रीकरणही पूर्ण झालं होतं. म्हणून प्राण साहेबांसोबत मी प्रवास केला. हाँगकाँगमध्ये आमची फ्लाईट कॅन्सल झाली, म्हणून आम्हाला सकाळच्या फ्लाईटची वाट बघायची होती.


आम्हाला संपूर्ण रात्र एकाच हॉटेलमध्ये घालवायची होती. असा विचार करून मला खूप भीती वाटू लागली. माझ्या मनात अशी भावना होती की आज प्राणजी माझ्यावर बलात्कार करतील. हॉटेलमध्ये गेल्यावर ते मला म्हणाले तुझ्या रुमचं लॉक आतून व्यवस्थित लावून घे.



मी बाजूच्याच रुममध्ये आहे. जर कोणी दार वाजवलं. तर दार उघडू नको. मला फोन कर. यानंतर मी दरवाजा बंद केला आणि मी खूप रडली, प्राण यांच्याबद्दल मी काय विचार करत होते. याचं मला खूप वाईट वाटतं होतं. त्याच दिवशी मला क्लिअर झालं की, पडद्यावरचा खलनायक खरोखर एक चांगला माणूस असतो.