मुंबई : आंध्र प्रदेशातील एका खेड्यात चैंचू रेड्डी नावाचा एक शेतकरी राहतो. चैंचूची 10 एकर जमीन आहे. एका मित्राने त्याला सल्ला दिला की, तुझ्याकडे खूप जमीन आहे. त्यात चांगलं धान्य आणि गव्हाची शेती कर, चांगला भाजीपाला लाव. यामुळे तुला बराच नफा मिळेल. शासकीय कर्ज घेऊन चैंचूने 10 एकर जागेवर भाजीपाला पिकविला, मात्र त्या भाजीपाल्याला किड लागली, यामुळे चैंचूचं पीक उध्वस्त झालं. पण यातून कर्जाची रक्कम कशी बशी फिटली. मात्र, भाजीपाला पिकामध्ये बराच फायदा होतो हे त्याला समजलं होतं आणि म्हणूनच चैंचूने हार मानली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच्याच पुढच्या वर्षी, चैंचूने पुन्हा भाजीचं पिक घेतलं, मात्र यावेळी देखील किड्यांनी पाठलाग सोडला नाही. एवढंच नव्हे तर तो एका बाबांकडे चैंचू गेला. तेव्हा त्यांनी चैंचूला सांगितलं की, तुमच्या पिकाला लोकांची नजर लागली आहे.


पिकाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी चैंचूने शेतात बुजगावण ठेवलं. मग एके दिवशी चैंचूने आपल्या मित्राला या सगळ्या प्रकाराबद्दल सांगितलं, यावंर मित्र म्हणाला की, फक्त एकच व्यक्ती आपलं पीक वाईट नजरेपासून वाचवू शकते आणि ती म्हणजे सनी लिओनी.



सनी लिओन कोण आहे हे चैंचूला माहित देखील नव्हतं. मित्राने मोबाईलवर सनी लिओनीचा फोटो दाखविला. दुसर्‍या दिवशी, चेंचू आणि त्याचा मित्र हैद्राबादला गेले आणि तेलुगु भाषेत लिहिलेले लाल बिकीनीमधील सनी लिओनीचं मोठे फ्लॅक्स पोस्टर तयार करुन त्यांनी घेतलं, ज्यामध्ये तेलुगु भाषेत लिहीलं होतं की, 'हे डोंट क्राय इफ यू जेलस ऑफ मी' आणि हे पोस्टर चैंचूने आपल्या शेताबाहेर लावलं.  


चेंचूच्या मित्राची आयडिया उपयोगात येवू लागली होती.  जो पण त्या शेताच्या बाजूने जायचा तो शेतात न पाहता. फक्त सनीचं पोस्टर पाहात राहायचा, अशा प्रकारे चैंचूचं पीक नजर लागण्यापासून वाचलं.