मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन अनेक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. हिंदी व्यतिरिक्त ऐश्वर्याने आपल्या कारकिर्दीत दक्षिण चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ऐश्वर्याचा अभिनय समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी पसंत केला आहे. मात्र एकदा कॉमेडियन आणि अभिनेता रसेल पीटर्सने ऐश्वर्याची खिल्ली उडवली आणि तिला वाईट अभिनयाचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हटलं. वास्तविक, रसेल इंडो-कॅनेडियन स्पीडी सिंहच्या चित्रपटाचं प्रमोशन करत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 एका रिपोर्ट्स नुसार, एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये रसेल म्हणाला होता की, 'मला बॉलिवूडचा तिरस्कार आहे. सगळे चित्रपट रद्दी आहेत. हे माझं मत आहे. अनेक लोकांना बॉलिवूड आवडतं आणि पण मला चित्रपटांमधील गाणी, डान्स आणि ईमोशनल सीन्स आवडत नाही. मी माझ्या आयुष्यात कधीच बॉलिवूड चित्रपट पाहिले नाहीत. मी यापूर्वी बॉलिवूडमध्ये काम करण्यास नकार दिला आहे आणि यापुढेही करीन. पण मला आशा आहे की, काही चित्रपट निर्माते संधी घेतील आणि खरे चित्रपट बनवतील.


ऐश्वर्याबद्दल  केली कमेंट
एवढंच नाही तर रसेलने ऐश्वर्याची खिल्लीही उडवली. तो म्हणाला होता, 'ऐश्वर्या वाईट अभिनयाचा सर्वात मोठा पुरावा आहे. तिने वेळोवेळी सिद्ध केलं आहे की, बॉलिवूडमधील ते लोक सुपरस्टार बनू शकतात ज्यांच्याकडे फक्त सुंदर चेहरा आहे.


रसेल पुढे म्हणाला, ती अजून चांगली अभिनेत्री बनली नाही, पण हो सुंदर आहे. रसेलच्या या वक्तव्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता आणि अभिनेत्रीच्या चाहत्यांनी रसेलकडून त्याच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी केली होती. मात्र, कॉमेडिनने माफी मागितली नाही. पण चित्रपटाचे निर्माते अजय विरमानी यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.



ऐश्वर्याचे चित्रपट
ऐश्वर्या शेवटची  फन्ने खां चित्रपटात दिसली होती ज्यात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत होते. प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता ऐश्वर्या  पोन्नियन सेलवन या चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरून अभिनेत्रीचा लूक लीक झाला होता, ज्यात ती शाही लूकमध्ये दिसली होती.