सर्वसामान्य मुलीने लगावली अभिनेता सलमान खानच्या कानशिलात; जाणून घ्या यामागचं कारण
संपूर्ण बॉलीवूड सलमान खानला घाबरत असलं तरी एका सामान्य मुलीने सलमान खानला थप्पड मारली
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान लवकरच 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नेहमी दबंग खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी अभिनेता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
त्याच्या भांडणाचे किस्से अनेकदा माध्यमांसमोर आले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत सलमान खान त्याच्या एटीट्यूडसाठी ओळखला जातो. सलमान खानबद्दल असं म्हटलं जातं की, तो एकदा कुणावर भांडला की त्या स्टार्सचं करिअर बरबाद होतं.
भाईजान त्याच्या आयुष्यात कोणतंही चुकीचं काम सहन करत नाही. यामुळे त्याला खूप राग येतो. अनेक स्टार्सना त्याच्या रागाचा सामना करावा लागला आहे. आज आम्ही तुम्हाला सलमान खानबद्दल असं काही सांगणार आहोत जे ऐकून तुम्ही चक्रावून जाल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानला सर्वांसमोर एका मुलीने थप्पड मारली होती. ही गोष्ट दिल्लीची आहे.
संपूर्ण बॉलीवूड सलमान खानला घाबरत असलं तरी एका सामान्य मुलीने सलमान खानला थप्पड मारली. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल ना. हा सगळा प्रकार दिल्लीतील एका हॉटेलमध्ये घडला. यावेळी नशेत असलेल्या एका तरुणीने सार्वजनिक ठिकाणी थप्पड मारली होती. त्या पार्टीत सलमान खानसोबत सुष्मिता सेन, सोहेल खान आणि शिबानी कश्यप या अभिनेत्री होत्या. ही घटना 2009 सालची आहे. इतकंच नाही तर या तरुणीने पार्टीत आलेल्या पाहुण्यांनाही शिवीगाळ केली.
सलमान खानला थप्पड मारल्यानंतर मौनिका नावाच्या मुलीने सुष्मिता आणि सोहेलसह सर्व सेलिब्रिटींना शिवीगाळ केली होती. या सर्व प्रकारानंतरही सलमान खानने रागावर नियंत्रण ठेवत मुलीला निघून जाण्यास सांगितलं.
चाहत्यांच्या मनात असलेला सलमान सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सलमान असंख्य लोक फॉलो करतात, पण सलमानच्या लिस्टमध्ये काही ठराविक सेलिब्रिटींची नाव आहेत.