मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा असंख्य जोड्या आहेत ज्या कधी एकत्र आल्या आणि कधी विभक्त झाल्या. त्यातीलच एक जोडी म्हणजे अभिनेत्री रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा.  या दोघांची प्रेमकहाणी अजबच आहे. या दोघांची लव्हस्टोरी इतर कलाकारांपेक्षा वेगळी आहे. त्याला कारण आहे त्यांच प्रेम अतिशय बेरड होती. या दोघांनी प्रेमात पार केल्या होत्या सगळ्या सीमा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉयने कधीच आपलं प्रेम लपवलं नाही. दोघं एकमेकांसोबत बिनधास्त फिरायचे एवढंच नव्हे तर मोकळेपणाने आपलं प्रेम व्यक्त करायचे. रीना रॉय यांनी अवघ्या १९ व्या वर्षी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत 'कालीचरण' हा सिनेमा केला होता. 


अभिनेत्री रीना यांना सुरूवातीपासून अभिनय क्षेत्रात यायचं होतं. ७० च्या दशकात मॉडेलिंग करत करिअरला सुरूवात केली. मात्र त्यानंतर ती बॉलिवूडकडे आकर्षित झाली. 



सुरूवातीच्या काळात रीना यांनी अनेक कमी बजेट असलेल्या सिनेमात काम केलं. त्यानंतर १९७६ साली रीनाला शत्रुघ्न सिन्हा यांच्या अपोझिट रोल मिळाला. 'कालीचरण' सिनेमा प्रदर्शित होताच रीना रॉयचं नशिब संपूर्णपणे बदललं. 


हीच जोडी पुन्हा 'विश्वनाथन' सिनेमात दिसली. त्यानंतर सगळ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी याच जोडीवर लक्षकेंद्रित केलं. 


जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांच्या आयुष्यात पूनम सिन्हाची एन्ट्री झाली 


१९८१ साल उजाडताच रीना आणि शत्रुघ्न यांच्या नात्यात अनेक अडथळे आले. तो काळ बघून सगळ्यांना वाटत होतं की, आता हे दोघं लग्नच करतील. मात्र दुसरीकडे शत्रुघ्न सिन्हा यांच नाव पूनम सिन्हासोबत जोडलं जाऊ लागलं. एका रात्रीत हे दोघं लग्न करणार असल्याची बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरू लागली. 


अशी झाली पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांची ओळख 


शत्रुघ्न सिन्हा विमान प्रवास करत असताना त्यांची ओळख पूनम सिन्हासोबत झाली. असं म्हटलं जातं की, शत्रुघ्न सिन्हा यांना पाहताच क्षणी पूनम सिन्हा आवडल्या होत्या. त्यांची मैत्री खूप चांगली झाली आणि दोघांनी लग्न केलं. 
मात्र लग्नानंतरही शत्रुघ्न यांनी रीना यांना भेटणं सोडलं नाही. ते भेटतंच राहिले. पण त्या नात्याला काहीच अर्थ नव्हता. रीना रॉय यांना देखील आयुष्यात सेटल व्हायचं होतं. यानंतर जड अंतःकरणाने रीना वेगळ्या झाल्या. 



ब्रेकअपनंतर रीना यांनी पाकिस्तानचे क्रिकेटर मोहसिन खान यांच्यासोबत लग्न केलं. रीना रॉय यांच करिअर अतिशय चांगल्या टप्प्यावर असताना त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


लग्नानंतर काही वर्षे खूप छान गेली. मात्र त्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला. याच दरम्यान रीना आणि मोहसिन यांना मुलगी झाली जन्नत. यानंतरही रीना सिनेमात काम करत होती. मात्र मुलीच्या जन्मानंतर त्यांनी काम थांबवलं. कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला. याचवेळी मोहसिन यांनी लंडनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पण रीनाला ते मान्य नव्हतं. 


रीनाने तिचं मन आईसोबत शेअर केल्यावर तिने एक प्रश्न विचारला


त्या गोंधळातच रीनाने लंडनहून तिच्या आईकडे फोन केला. खुद्द रीनाने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. ती म्हणाला- “मी लंडनहून माझ्या आईला फोन केला आणि विचारलं- लग्नाचा अर्थ काय? तर आईने उत्तर दिले- 'सांभाळत राहा, लग्नाचा अर्थ सांभाळणे आहे. रीनाने आईचा विचार ऐकला आणि आपलं लग्न सांभाळलं. 


रीनाने संसार वाचवण्यासाठी मुलगी आणि नवऱ्यासोबत खूप वेळ घालवला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. १९९० साली रीना आणि मोहसिन यांचा घटस्फोट झाला.