मुंबई : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टनममध्ये गुरूवारी सकाळी केमिकल यूनिटमध्ये मोठ्या प्रमाणात वायूगळती झाली. यामध्ये ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये १०० लोकांची प्रकृती गंभीर आहे. १००० हून अधिक लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. '२०२० हे वर्ष कधी संपणार?' असा सवाल ट्विटच्या माध्यमातून केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका बाजूला कोरोना व्हायरस सारख्या जागतिक साथीच्या रोगाने संपूर्ण देशाला वेढीस धरलं आहे. त्यामध्ये आज झालेल्या या वायूगळतीमध्ये अनेकांच नुकसान झालं आहे. तसेच या दोन्ही गोष्टींचे पडसाद खूप काळापर्यंत उमटणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. 



यावर अभिनेत्री टिस्का चोपडाने ट्विट केलं आहे. 'हे भगवान... केव्हा हे २०२० वर्ष संपणार. हॉररवर हॉरर... कुटुंबियांच्याप्रती शोक व्यक्त केला आहे.'



तसेच अभिनेत्री कुबरा सैतने देखील ट्विट केलं आहे. 'गॅस लीक २०२० मधील ही आणखी एक उद्धवस्त करणारी घटना. या घटनेचे व्हिडिओ मन हेलावणारे आहेत. आता सरकारला काही तरी करायला हवं.'




सरकारकडून लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर आज पहाटे ही कंपनी पुन्हा सुरु करण्यात आली. त्यावेळी काही कामगार प्लांट सुरु करण्याच्या तयारीत होते. तेव्हा अचानकपणे विषारी वायूच्या गळतीला सुरुवात झाली. यामुळे अनेक कामगार जागीच बेशुद्ध पडायला सुरुवात झाली. आतापर्यंत साधारण १७० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २० जण गंभीर आहेत. या विषारी वायूमुळे तीन किमीच्या परिसरावर प्रभाव पडला असून आतापर्यंत एकूण ५ गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.