Tiger Shroff Birthday : जॅकी श्रॉफ यांच्याकडून टायगरचा तो व्हीडीओ शेअर करत खास शुभेच्छा
बॉलीवूडचा राइजिंग सुपरस्टार्सपैकी एक असलेला टायगर श्रॉफ आपला 31 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे.
मुंबई : बॉलीवूडचा राइजिंग सुपरस्टार्सपैकी एक असलेला टायगर श्रॉफ आपला 31 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. या खास दिवशी, वडील जॅकी श्रॉफसह टागरचा एक सुंदर व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल. हा व्हीडिओ 90 च्या दशकातील आहे.जेव्हा जॅकी श्रॉफच्या मांडीवर फिल्मफेअर अवॉर्ड घेण्यासाठी टायगर स्टेजवर पोहोचला होता.
2020 मध्ये जॅकी आणि टायगरचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि आता पुन्हा एकदा टायगरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर हा व्हीडिओ चर्चेत आहे. चाहते देखील या व्हिडीओला खूप पसंती देत आहेत.
व्हीडिओमध्ये असे दिसून येते की जॅकी श्रॉफने आपल्या वडिलांच्या मांडीवर टायगर श्रॉफला उचलून घेतलय, जो आपल्या वडिलांच्या मांडीवर आरामात झोपलेला दिसतोय. त्याचवेळी जॅकी श्रॉफ ज्येष्ठ अभिनेत्री रेखाकडून फिल्मफेअर अवॉर्ड घेताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये हे पाहता येईल की रेखाने छोट्या टायगरला किस देखील केले आहे
या पुरस्काराबद्दल आपल्या भाषणातून सुभाष घई, अनिल कपूर आणि विधू विनोद चोप्रा यांचे आभार जॅकी श्रॉफ यांनी मानले होते. 1990च्या चित्रपटात जॅकी श्रॉफला हा पुरस्कार देण्यात आला. टायगर श्रॉफच्या वाढदिवसानिमित्त जॅकि श्रॉफनं थ्रोबॅक फोटो शेअर केलाय.
वडील जॅकी श्रॉफ आई आयशा श्रॉफ आणि बहीण कृष्णा श्रॉफ यांनी टायगरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. टायगरची खास मैत्रीण दिशा पाटणीनेही देखीलटायगरला खास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.