Aishwarya -Abhishek Marriage : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाला 17 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या जोडप्याला एक मुलगी देखील आहे. तिचे नाव आराध्या बच्चन आहे. सध्या सोशल मीडियावर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, अभिषेक बच्चनने नुकतेच आपले लग्न असल्याचे सांगून या अफवांना पूर्णविराम दिला आहे. परंतु, अभिषेकच्या या विधानावर चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. पण तुम्हाला माहिती आहे का की एकदा एका मॉडेलने अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न रोखण्यासाठी हाताची नस कापली होती. 


अभिषेक आणि ऐश्वर्याच्या सेलिब्रेशनमध्ये राडा 


अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न 2007 मध्ये झाले. या दोघांचे लग्न हे अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा या बंगल्यात पार पडले होते. यामध्ये वधू ऐश्वर्या राय सोनेरी कांजीवरम साडी आणि पारंपारिक दागिन्यांमध्ये स्वर्गातून उतरलेल्या अप्सरा सारखी दिसत होती आणि अभिषेक बच्चन हे देखील पांढऱ्या शेरवानीमध्ये राजकुमारासारखा दिसत होता.


ऐश्वर्या आणि अभिषेकला लग्नाच्या वेळी अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. ज्यामध्ये या दोघांचे लग्न थांबवण्याचा प्रयत्न एका सुप्रसिद्ध मॉडेलने केला होता. ही मॉडेल म्हणजे जान्हवी कपूर. ही जान्हवी कपूर अभिनेत्री नसून ती एक मॉडेल आहे. तिने सेलिब्रेशनच्या वेळी लग्न थांबवण्यासाठी थेट स्वत:च्याच हाताची नस कापून घेतली होती. ही घटना फार कमी लोकांनाच माहिती आहे. 


मॉडेल जान्हवी कपूरने काय केले होते आरोप? 


अभिषेक बच्चन आणि माझं 2006 मध्ये लग्न झालं. असा दावा तिने यावेळी केला होता. या मॉडेलने अभिषेकच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही केली होती. मात्र, मॉडेल जान्हवी कपूर हिच्याकडे दोघांच्या लग्नाचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे पोलिसांनी देखील तिची तक्रार दाखल करुन घेतली नाही. तिने अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न मोडण्यासाठी खूप प्रयत्न केले. हाताची नस कापल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. 


यावेळी अभिषेकने आपले मॉडेलशी कोणतेही नाते नसल्याचे सांगून हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मॉडेलवर गुन्हा दाखल केला. सेलिब्रेशनच्या वेळी मॉडेलने घातलेल्या या गोंधळामुळे लग्न सोहळ्याचा आनंद देखील कमी झाला होता.