मुंबई : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आता या जगात नाहीत. तरीही त्यांच्या चाहत्यांच्या आठवणीत ते कायम आहेत. सिनेसृष्टीत त्यांचं यश हे आश्चर्य वाटण्यापेक्षा कमी नव्हतं. मात्र, त्यांचा सुपरस्टारडम फारसं टिकू शकलं नाही आणि काही वर्षानंतर अमिताभ बच्चन सुपरस्टार या सिंहासनावर बसले. लोकं अजूनही या दोन सुपरस्टार्समधील नात्यावर चर्चा करतात. या दोघांच्या नात्यावर बरंच काही लिहिलं देखील गेलं आहे. आज आम्ही तुम्हाला असाच एका किस्सा सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं म्हणतात की, राजेश खन्ना यांना अमिताभ यांच्या बरोबर इनसीक्यूरिटी वाटू लागली होती. याचं कारण म्हणजे 1971मध्ये रिलीज झालेला 'आनंद' हा चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांनी केलं होतं. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर नवीन कलाकार अमिताभ बच्चन यांचं सुपरस्टार राजेश खन्नापेक्षा जास्त कौतुक झालं होतं.


तेव्हापासूनच राजेश खन्ना यांनी अमिताभ यांना खाली खेचण्यास सुरुवात केली. मात्र, या चित्रपटासाठी राजेश खन्ना यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार आणि अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.


1972मध्ये आलेल्या 'बावर्ची' या चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली होती. विशेष म्हणजे हर्षिकेश मुखर्जी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत होते. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन नेहमीच आपली गर्लफ्रेंड जया बच्चन आणि असरानीसोबत इतर मित्रांना भेटायचे.


 मग राजेश खन्ना त्यांचा वारंवार अपमान करायचे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, एकदा अमिताभ सेटवर पोहोचल्यानंतर त्यांनी राजेश खन्ना यांना स्पष्ट शब्दात प्रतिउत्तर दिलं होतं


जया बच्चन यांनी हे जेव्हा ऐकलं तेव्हा त्या रागाच्या भरात लाल झाल्या. त्या राजेश खन्नाकडे गेल्या. आणि म्हणाल्या, 'एक दिवस, तू पाहशीलच की ही व्यक्ती किती मोठी होईल ते'. काही वर्षांत जया यांचं हे विधान बरोबर सिद्ध झालं आणि राजेश खन्ना यांच्या करिअरची उतरतीकळा सुरु झाली. अशाप्रकारे बीग बी महानायक बनले.