मुंबई : सध्या नवरात्रं सुरू आहे आणि आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या भक्तीप्रमाणे देवीचे दर्शन घेण्यासाठी देवीच्या दाराजवळ पोहोचतो. त्याचप्रमाने अभिनेत्री काजोल देखील दरवर्षीप्रमाणे दुर्गापूजा पंडलमध्ये पोहोचली. त्यानंतर कार्यक्रमादरम्यानचे काजोलची अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात ती भावनिक दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये तर काजोल तिच्या नातेवाईकांच्या खांद्यावरती डोकं ठेऊन रडताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात दुर्गापूजा मोठ्या थाटामाटात साजरी केली जात असली तरी, बंगाली लोक या उत्सवातीत सर्वात जास्त उत्साही असतात. काजोल देखील त्यांपैकी एक आहे जी दरवर्षी दुर्गा पंडालाला भेट देते. मंगळवारी, 12 ऑक्टोबर रोजी देखील काजोल दरवर्षीप्रमाणे पंडालवर पोहोचली, त्यानंतर तेथील काजोलचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.


यातील काही फोटोंमध्ये काजोल मास्कमध्ये तर काहींमध्ये विना मास्क दिसत आहे. तर काही फोटोंमध्ये ती भावनिक दिसत आहे.


या प्रसंगाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात काजोल रडताना आपण पाहू शकतो, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, काजोल तिच्या काकांना खूप वर्षांनी भेटल्यानंतर भावनीक झाली, ज्यामुळे तिला तिचे आश्रू अनावर झाले.



गेल्यावर्षी अजय देवगणचा चुलत भाऊ अनिल देवगणच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब दुर्गा पूजा साजरी करू शकले नाही. ज्यामुळे काजोलला तिच्या नातेवाईकांना भेटता आले नाही. आता खूप दिवसांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटल्यानंतर काजोला आपल्या भावना आवरल्या नाहीत, ज्यामुळे ती रडू लागली आणि, तिचे काका तिला शांत करत होते.