`आम्ही खान नाही बच्चन आहोत` सलमानबद्दल प्रश्न विचारताच भडकली ऐश्वर्या राय
सेलिब्रिटींच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायला त्यांच्या चाहत्नांना नेहमीच आवडतं. त्यातचं कॉफी विथ करण हा शो कॉन्ट्रोवर्सीमुळेच चर्चेत आहे. सेलिब्रिटी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल एक्सक्लुझिव्ह खुलासे करत असतात.
मुंबई : करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो नेहमीच कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये सर्वात आवडत्या जोडीपैकी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन आहेत. कपल गोल्स देण्याच्या बाबतीत ही जोडी कधीही मागे पडली नाही. या शोमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावतात आणि मग सेलिब्रिटी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासेदेखील करतात. नुकताच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चने मणिरत्नम दिग्दर्शित पोन्नियिन सेल्वन 1 या चित्रपटातून दमदार कमबॅक केलं. हा सिनेमा बॉक्सऑफिसव चांगलाच आपटला.
सेलिब्रिटींच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायला त्यांच्या चाहत्नांना नेहमीच आवडतं. त्यातचं कॉफी विथ करण हा शो कॉन्ट्रोवर्सीमुळेच चर्चेत आहे. सेलिब्रिटी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल एक्सक्लुझिव्ह खुलासे करत असतात. आता अशीच करणने घेतलेली ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलाखत खूप चर्चेत आहे.
या शोमध्ये यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेक या जोडीने हजेरी लावली होती. व्हायरल होणारी ही मुलाखत फार जुनी आहे. यामध्ये करण ऐश्वर्याला अभिषेकसमोरच तिच्या पर्सनल लाईफबद्दल प्रश्न विचारताना दिसतोय. यावेळी हा प्रश्न ऐकून अभिषेकलाही धक्का बसतो. करणचा ऐश्वर्याला प्रश्न हा सलमानबाबत होता. जो ऐकून सगळेच हैराण झाले. मात्र लक्ष वेधलं ते ऐश्वर्याच्या उत्तराने. ऐश्वर्याच्या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रॅपिड फायर राऊंडमध्ये करण जोहरने ऐश्वर्याला विचारलं की, तुझ्यामते सगळ्यात प्रसिद्ध आणि सर्वोत्कृष्ट खान कोण आहे आहे? आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान की सैफ अली खान? करणच्या या प्रश्नावरं ऐश्वर्या म्हणते, प्रत्येकवेळी मला फक्त 'खान'बद्दलच प्रश्न विचारले जातात, 'बच्चन'बद्दल कोणीच काहीच प्रश्न विचारत नाही! आम्ही बच्चन आहोत, खान नाही! अभिनेत्रीचं हे उत्तर सगळेच आश्चर्यचकित होतात. करणच्याही भुवया उंचावतात.
खरंतर ऐश्वर्याकडून या उत्तराची कोणालाच अपेक्षा नव्हती. मात्र करणच्या या प्रश्नावर ऐश्वर्याने अतिशय बिंधास्त उत्तर दिलं. हा प्रश्न ऐकून ऐश्वर्या रायला धक्का बसेल अशी लोकांची अपेक्षा होती, पण तसं काही घडलं नाही. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन (Aishwarya Rai And Abhishek Bachchan) यांचा विवाह 20 एप्रिल 2007 रोजी झाला. 2011 मध्ये ऐश्वर्या रायने मुलगी आराध्या बच्चनला जन्म दिला.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहरा आहेत. ऐश्वर्या रायने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांनाच वेड लावले आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे आजच्या बॉलीवूडमधील सर्वात प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांना इंडस्ट्रीचं पॉवर कपल असंही म्हणतात.