सावत्र आईच्या प्रश्नावर सैफ अली खानच्या लेकीनं दिलं असं बेधडक उत्तर की क्षणात कौतुक कराल
Sara Ali Khan and Kareena Kapoor: सारा अली खान आणि करीना कपूर यांच्यात फार वेगळा बॉन्ड आहे. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून करीनानं साराला अनेकदा बेधडक प्रश्न विचारले आहेत परंतु तिनं मात्र त्यांची शांतपणे उत्तर दिलेली आहेत.
Sara Ali Khan and Kareena Kapoor: सारा अली खान आणि करीना कपूर या अनेकदा चर्चा असतात. सारा अली खान आणि करीनाची मैत्रीही खूप खास आहे. त्या अनेकदा एकत्र स्पॉट होतात सोबतच आपल्या गुजगोष्टीही शेअर करताना दिसतात. सारानं नुकताच आपला 28 वा वाढदिवस साजरा केला आहे. सोशल मीडियावर तिनं काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती आपल्या मित्रमैत्रीणींसोबत आपला वाढदिवस सेलिब्रेट करताना दिसते आहे. यावेळी कॅप्शनमध्ये असंही लिहिलं आहे की ती आपल्या या फ्रेंन्डला 10 वर्षांनी भेटते आहे. त्यामुळे तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती.
या फोटोला तिच्या चाहत्यांनीही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. यावर अनेक लाईक्सही मिळवले आहेत. करीना सारा अली खानची सावत्र आली असली तरीसुद्धा त्यांच्यात फार मस्त बॉण्डिंग आहे. त्याचे हे बॉण्डिंग पाहून अनेकदा त्या दोघींना ट्रोलही केले जाते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. मध्यंतरी करीनाच्या एका टॉक शोमध्येे सारानं हजेरी लावली होती आणि त्यामुळे त्या दोघींची चांगली चर्चा ही रंगलेली होती.
2020 साली 'व्हॉ वूमन वॉन्ट' हा करीनाचा शो बराच गाजला होता. यावेळी सारा अली खाननं या शोमध्ये हजेरी लावली होती. त्या एकमेकांच्या मैत्रीणी असल्याप्रमाणे एकमेकींशी अत्यंत बोल्ड विषयावर बोलत होत्या. त्यावेळीही त्या दोघींनी ट्रोलही करण्यात आले होते. त्यांनी सेक्स, वन नाईट स्टॅण्ड, इंटिमेट चॅट, इंटिमसी, डेटिंग, लव्ह एण्ड रिलेशनशिप्स यांवर भरपूर गप्पा मारल्या होत्या. त्यामुळे त्याची विशेष करून चर्चा रंगलेली होती. आता चर्चा आहे ती म्हणजे त्या दोघींच्या त्या चॅट शोची. यावेळी करीनानं तिला अनेक प्रश्न विचारले त्याची सारा अली खान हिनं फार मोकळ्या पद्धतीनं उत्तर दिली होती. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. करीनानं सारा अली खानला वन नाईट स्टॅण्डवर एक प्रश्न विचारला होता ज्याचे उत्तर देताना मात्र सारा थोडी नाराज झालेली दिसली. नक्की ती त्यावेळी काय म्हणाली होती पाहुया :
हेही वाचा - Relationship Tips: 'या' 5 प्रकारच्या पुरूषांच्या प्रेमात तरूणींनी पडू नये कारण...
या शोदरम्यान साराला ती चिडवायचाही प्रयत्न करते. तिला ती विचारते की, ''तुझा हा एपिसोड सैफला पाठवला तर चालेल का? त्यानं हा संपुर्ण पहिला तर?'' त्यावर सारा अली खान म्हणते की,''हो का नाही? माझ्या वडिलांनी सपुंर्ण एपिसोड पाहिला तर माझी काहीच हरकत नाही.'' यापुढे ती तिला विचारते की, ''मला माहिती नाही की हा प्रश्न विचारला पाहिजे की नाही. मला माहिती नाही परंतु वन नाईट स्टॅण्ड?'' त्यावर सारा अली खान म्हणते की ''कधीच नाही!'' त्यावर करीनाही मोकळा श्वास सोडते. सारा अली खानच्या या उत्तरावर मात्र सगळे चाहते तिचं कौतुक करतात.