मुंबई : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने देशात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज लतादीदींच्या निधनाला 7 दिवस पूर्ण झाले, पण अद्यापही त्यांच्या जाण्याचं दुःख कोणी पचवू शकलेलं नाही. लतादीदींच्या आठवणीत नुकताचं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अनेक कलाकारांनी दीदींच्या आठवणीतील किस्से शेअर केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातील एक म्हणजे जेव्हा दीदी वाघा बॉर्डरवर पोहोचल्या होत्या. लतादीदींचे अगदी जवळचे व्यक्ती हरीश भिमानी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमादरम्यान भिमानी यांना लतादीदी आणि नुर जहाँ यांच्यात असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. 



दोघींच्या नात्याबद्दल सांगताना ते म्हणाले, 'दोघींमध्ये नितळ मैत्रीचं नात होतं. दोघी कायम एकमेकींनी प्रेरणी द्यायच्या. अतिशय उत्तम गायिका होत्या, पण त्यांच्यात स्पर्धा कधीचं नव्हती.'



ते पुढे म्हणाले, 'नुर जहाँ दीदींनी लत्तो म्हणून हात मारायच्या.... आणि म्हणायच्या लत्तो तू फक्त गात राहा... सगळ्यांना मागे टाकून दे... दोघांनाही एकमेकांसोबत चविष्ट पदार्थ खायला खूप आवडायचं.'


'एकदा वाघा बॉर्डरवरील नो मॅन्स लँडमध्ये दोघींनी एकत्र जेवण केले होते. नूरजहाँ यांनी बिर्याणी बनवली होती आणि लतादीदीं ती बिर्याणी खायची होती. पण सीमेवरून मालाची देवाणघेवाण शक्य नव्हती.'


'पण लताजी आणि नूरजहाँ यांच्या विनंतीवरून दोघी वाघा बॉर्डरवर असलेल्या नो मॅन्स लँडमध्ये पोहोचल्या. तेव्हा दोघांसाठी भारत आणि पाकिस्तानची सीमा खुली करण्यात आली.'