मुंबई : टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री माहिका शर्मा आज 26 जुलै 2021 रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. महिका शर्मा टीव्ही आणि चित्रपटांमधील तिच्या कामापेक्षा तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कधी तिने शाहिद आफ्रिदीसोबत रात्र घालवल्याचं वक्तव्य केलं तर कधी राहुल गांधीबद्दल वक्तव्य करत ती चर्चेत आली. चला तर जाणून घेऊया कोण आहे माहिका शर्मा आणि तिने कोणती वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या कामापेक्षा आपल्या स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली माहिकाचं क्रिकेटर-राजकारणी गौतम गंभीरवर क्रश होतं. माहिका म्हणाली होती की क्वारंटाइन दरम्यान गौतम गंभीर तिचा क्रश होता. ही तीच माहिका शर्मा आहे जिने एकदा म्हटलं होते की, तिला पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसोबत 'हमबिस्तर' व्हायचे आहे. हमबिस्तर म्हणजे त्या व्यक्तीसोबत झोपणे. 



माहिका शर्मा तिच्या बोल्ड अभिनयामुळे चर्चेत असते. महिकाने 2019 मध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत वक्तव्य केले होते. काँग्रेसच्या विजयासाठी तिने नवरात्रीचा उपवास ठेवला. यासोबतच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिने राहुल गांधींवरील प्रेम व्यक्त केले होते.


महिका ही विविध संस्था आणि एनजीओ संस्थांचा भाग आहे. वेश्याव्यवसाय संपवण्याच्या उद्देशाने तिने मानवी हक्क, महिला आणि मुलांचे आरोग्य आणि भारतातील लैंगिक कामगारांचे पुनर्वसन यासाठी काम केले आहे. हे सगळं करूनही माहिकाच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा ती अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली, जेव्हा तिची मैत्री ब्रिटिश पॉर्न स्टार डॅनी डीसोबत असल्याचं समोर आलं. महिका शर्मा डॅनी डीसोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, माहिकाने या गोष्टी निराधार असल्याचं म्हटलं होतं.


वृत्तांवर विश्वास ठेवला तर, माहिका एकता कपूरच्या आगामी टेलिव्हिजन शो 'संसार'सह टेलिव्हिजन पडद्यावर परत येईल, जो करिश्मा कपूर आणि गोविंदाच्या 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राजा बाबू'वर आहे. यात महिका ही करिश्माची भूमिका साकारणार आहे. 


महिका शर्मा अनेक दिवसांपासून मॉडेलिंग करत आहे. तिने 'मिस टीन नॉर्थ ईस्ट'चा किताबही पटकावला आहे. माहिकाने 'रामायण', 'एफआयआर' आणि 'पोलिस फॅक्टरी' यांसारख्या टीव्ही शो आणि 'मर्दानी', 'मिस्टर जोबी करवालो' आणि 'चलो दिल्ली' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.