मुंबई : सलमान खान त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी तसंच चित्रपटांमधील त्याच्या लव्ह अँगलसाठी ओळखला जातो. 'मैंने क्या किया', 'दबंग' किंवा 'रेडी' चित्रपट असो, प्रत्येक चित्रपटात त्याची प्रेम एक्सप्रेस करण्याची शैलीही खूप वेगळी आहे. सलमान खानने अनेकवेळा चित्रपटांमध्ये प्रेम व्यक्त केलं असलं तरी वास्तविक जीवनात त्याने असं फारसं केलं नाही. सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मर्डर फेम अभिनेत्री त्याला त्याच्या मनातल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मलायका अरोरा बिग बॉसच्या सेटवर पोहोचली आहे आणि ती सलमानशी तिच्या मनातल्या गोष्टी बोलत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर सलमान मल्लिकाला हाताने खाऊ भरवताना दिसत आहे.



सलमान खानची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. सलमानच्या फॅनने कमेंट करत लिहिलं आहे की, 'भाईला पहिल्यांदाच असं पाहतोय. तर दुसरीकडे दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं की,  क्या बात है काय एक्टिंग केली आहे. सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा 'अतिम' चित्रपटात दिसला होता. त्याचबरोबर तो आता 'टायगर 3'मुळे चर्चेत आला आहे.