मुंबई : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा तिच्या बिंधास्त स्टाईलसाठी ओळखली जाते. प्रियंका तिचं म्हणणं अगदी बिनधास्तपणे सगळ्यांसमोर मांडते आणि त्यात तिला कोणतीही लाज वाटत नाही. प्रियांका  तिच्या अफेअर आणि सेक्स लाईफबद्दल खुलेपणाने नेहमी बोलते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणच्या शोमध्ये प्रियांकाने अनेक गुपिते उघड केली
कॉफी विथ करण सीझन 5 मधील प्रियांका चोप्राचा एक जुना व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये देसी गर्ल प्रियंका तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे करताना दिसत आहे, जे जाणून घेतल्यावर तुम्हालाही धक्का बसू शकतो. कॉफी विथ करणच्या कॉफी शॉट्स राउंडमध्ये करण जोहरने प्रियंका चोप्राला बरेच वैयक्तिक प्रश्न विचारले. तिनेही प्रत्येक प्रश्नाला बिंधास्तपणे उत्तर दिली. कोणतीही लाज न बाळगता तिने अनेक गुपिते उघड केली...


शो दरम्यान करण जोहरने प्रियांका चोप्राला विचारलं की, ब्रेकअपनंतर तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला कधी किस केलं आहे का? यावर प्रियांकाने होकारात उत्तर दिलं. इतकंच नाही तर करणच्या शोमध्ये प्रियांकाने फोनवर सेक्स केल्याची कबुलीही दिली.


करणने प्रियांकाला विचारलं- तू कधी फोन सेक्स केला आहे का? यावर प्रियांकानेही होकारार्थी उत्तर दिलं. त्याचवेळी करणलाही आपल्या भावनांवर ताबा ठेवता आला नाही. त्यानेही त्याचं गुपित उघड केलं आणि म्हणाला, मी एकदा फोन सेक्स केला होता, तो सुद्धा जेव्हा बॅटरी संपणार होती, कारण माझ्याकडे तेव्हा कोणताच दुसरा पर्याय नव्हता.


करणसोबत प्रियांकाची मस्ती
करणने प्रियांकाला पुढे विचारलं की, तिने तिच्या जोडीदारासोबत आंघोळ केली आहे का? यावर अभिनेत्रीचंही उत्तर होकारार्थी होतं.  कॉफी शॉट्सच्या सेशनमध्ये प्रियंका आणि करणने स्वतःबद्दल अनेक धक्कादायक आणि बोल्ड खुलासे केले आहेत. चाहत्यांना प्रियांकाचा स्पष्टवक्तेपणा आवडला आहे