मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याची फॅन फॉलोईंग किती आहे हे काही वेगळं सांगायला नको. त्याच्या फॅन्सच्या यादीत तरूणांसोबतच तरूणींचीही मोठी गर्दी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाखों तरूणी त्याच्या हॉट लूकवर, त्याच्या मस्तीखोर स्वभावावर जीव ओवाळतात. मात्र काही वर्षांपूर्वी याच रणवीर सिंहच्या गर्लफ्रेन्डने त्याला डंम्ब केले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे या मुलीने रणवीरला आदित्य रॉय कपूरसाठी सोडले होते. 


रणवीर सिंहसोबत वेळ घालवण्याची एक संधी मिळावी, यासाठी तरूणी वाट्टेल ते करायला तयार असतात. मात्र त्याच्याच गर्लफ्रेन्ड त्याला दगा देऊन आदित्यचा हात धरला होता. रणवीर नुकताच नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये आला होता. या शोमध्ये येणारे कलाकार हे त्यांच्या मनातील अनेक गोष्टींचा खुलासा करतात. तसाच रणवीर सिंहनेही केला. त्याने कॉलेजच्या दिवसांमध्ये घडलेल्या एका घटनेचा खुलासा यात शोमध्ये केलाय. 


त्याने सांगितले की, ‘ज्या कॉलेजमध्ये तो होता त्याच कॉलेजमध्ये आदित्य रॉय कपूर सुद्धा होता. ज्यूनिअर कॉलेजमध्ये आदित्यवर मुली जीव ओवाळायच्या. त्यावेळी मी एका मुलीसाठी वेडा होतो. त्या मुलीचं आता लग्न झालंय आणि एका मुलाची आई आहे. मी तिच्या प्रेमात वेडा झालो होतो. ४ ते ५ वर्ष मी तिच्याच मागे होतो. त्या मुलीने मला आदित्य रॉय कपूरसाठी सोडलं होतं’.


रणवीरने त्याच्या त्या गर्लफ्रेन्डचं नाव तर नाही सांगितलं, पण त्याचा हा खुलासा अभिनेते धर्मेंद्र यांची मुलगी अहाना देओलकडे इशारा करतो. मीडिया रिपोर्टनुसार, अहाना ही कॉलेजच्या दिवसांमध्ये रणवीर सिंह आणि आदित्य रॉय कपूरला डेट करत होती. २०१४ मध्ये अहानाने वैभव अरोरासोबत लग्न केलं आणि आता तिला एक २ वर्षांचा मुलगा आहे. सध्या रणवीर सिंह हा अभिनेत्री दीपिका पादुकोनला डेट करतो आहे.