मुंबई : प्रेमाच्या नात्यात अनेकदा असे निर्णय घेतले जातात ज्या निर्णयांचा पुढे जाऊन पश्चाताप होतो. असं झालं नाही, तर ते निर्णय आपल्याला बरंच काही शिकवून जातो. अशाच काही निर्णयांमधील एक म्हणजे नात्यात बाळाचा विचार करण्याचा किंवा त्यासाठीची तयारी करण्याचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणतंही नातं काही टप्प्यांवरून पुढे आल्यानंतर काही अशी वळणं येतात जेव्हा फार टोकाचे निर्णयही घ्यावे लागतात. अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या जीवनातही असंच वळण आलं होतं. 


जेव्हा लग्न न होताही त्या गरोदर राहिल्या होत्या. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचर्ड यांच्याशी त्यांचं असणारं नातं सर्वज्ञात होतं. पण, त्यांच्या या नात्याची परीक्षा तेव्हा पाहिली गेली, जेव्हा पोटातल्या बाळाची चाहूल त्यांना लागली. 


आयुष्याच्या या वळणावर दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांनी त्यांना साथ दिली. एक मित्र म्हणून ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. चर्चा अशाही झाल्या की, नीना गुप्ता गरोदर असताना सतीश कौशिक यांनी त्यांना लग्नासाठी विचारलं होतं. पण, खरी बाब वेगळीच होती. (neena gupta satish kaushik)


नीना यांनी त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकामध्ये उल्लेख करत हा किस्सा सांगितला होता. जेव्हा सतीश कौशिक नीना यांना म्हणाले होते, 'जास्त काळजी करु नकोस, बाळ सावळ्या वर्णाचं असल्यास तू सांग की ते मूल माझं आहे. आपण लग्न करुया. कोणाला यावर शंकाही वाटणार नाही'.


ज्यानंतर बऱ्याच वर्षांनी कौशिक यांनी एका मुलाखतीत माहिती देत नीना यांची प्रशंसा केली. लग्न न करता एका बाळाला मोठं करणं कौतुकाचं असल्याचं ते म्हणाले. एक खरा मित्र म्हणून मी नीनाला आधार देऊ इच्छित होतो. त्या एकट्या पडाव्या असं कौशिक यांना वाटत नव्हतं. 



शेवटी मित्रच एकमेकांना मदत करतात, याच धारणेमुळं लग्नाचा मुद्दा कौशिक यांनी नीना गुप्ता यांच्यासमोर मांडला होता. 


जेव्हा नीना गुप्ता गरोदर होत्या त्यादरम्यानच कौशिक आणि त्यांची मैत्रीही विशेष रंगात आली. ते एकमेकांना आधार देऊ लागले. आजमितीस त्यांचं हे नातं सर्वांना हेवा वाटेल असंच आहे.