...आणि ममता बॅनर्जी यांनी शाहरुख खानला दिली लिफ्ट, पाहा व्हिडिओ
बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान नुकताच कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल झाला होता.
नवी दिल्ली : बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान नुकताच कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल झाला होता.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
या कार्यक्रमात अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री काजोल यासारख्या सिनेकलाकारांनी उपस्थिती लावली. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कार्यक्रमाला उपस्थित होत्या. तर, शाहरुख खान मुख्य अतिथी होता.
काही काळ कार्यक्रमात थांबल्यानंतर विमानतळावर जाताना स्वत: ममता बॅनर्जी यांनी अभिनेता शाहरुख खान याला विमानतळावर ड्रॉप केलं. यावेळी शाहरुख खानने गाडीतून उतरल्यावर ममता बॅनर्जी यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतला.
अभिनेता शाहरुख खान चक्क ममता बॅनर्जी यांच्या पाडा पडत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अभिनेता शाहरुख खान आपली मोठी बहिण मानतो. बहिण-भावाच्या प्रेमाचीच एक झलक सर्वांना कोलकातामध्ये पहायला मिळाली. विमानतळावर स्वत: ममता बॅनर्जी आपल्या सॅन्ट्रो कारमधून शाहरूख खानला सोडण्यासाठी आल्या. त्यानंतर शाहरुख खानने त्यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतला.