मुंबई : सुहाना खान ही इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेल्या स्टार किड्सपैकी एक आहे. सुहानाने आजवर बॉलिवूडमध्ये डेब्यू केला नसला तरीही सोशल मीडियावर सुहानाची खूप चर्चा आहे. सुहाना खूप लोकप्रिय आहे. तिचे इंस्टाग्राम फॉलोअर्स बघितलं तर आजच्या काळात 2.7 मिलियन लोकं तिला फॉलो करतात. सुहाना नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.
 
वडिलांसोबत आहे एक खास नातं  
खरं तर, मुली वडिलांच्या लाडक्या असतात आणि सुहाना खान देखील शाहरुखची राजकुमारी आहे. तो लाडक्या सुहानावर जीव ओवाळून टाकतो. त्याचबरोबर सुहानालाही तिचे वडिल खूप आवडतात. त्याचबरोबर सुहानाने शाहरुखचा जीवही वाचवला. हे वाक्य खुद्द शाहरुख खानने शेअर केलं आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, कोलकाता नाईट रायडर्सने 2012 मध्ये पहिल्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली तेव्हा तो खूप उत्साही होता आणि तो उत्साहाच्या भरात बाल्कनीतून उडी मारायला निघाला होता तेव्हा अचानक सुहाना खानने त्याला मागून पकडले आणि तो वाचला.


लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे
सुहाना खान लवकरच इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. द आर्चीज चित्रपटात ती इतर अनेक चेहऱ्यांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. झोया अख्तर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे ज्यात खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा सारखे स्टार किड्स देखील असतील. या चित्रपटाचा पहिला टीझर समोर आला आहे. ज्यामध्ये सुहाना खान खूपच सुंदर दिसत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.