मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीच्या अचानक एक्झिटने समस्त बॉलिवूडवर शोककळा पसरलीयं. तिच्या अनेक आठवणी उजागर केल्या जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिचे किस्से, सिनेमा, हिट गाणी या सर्वांतून श्रीदेवी पुन्हा पुन्हा आठवतेय. दरम्यान अभिनेत्री रेखा आणि श्रीदेवीमध्ये असलेल्या स्पर्धेच्या आठवणीही समोर आल्या. 


श्रीदेवीची एन्ट्री 


 वयाच्या २१ व्या वर्षीच श्रीदेवी अभिनेत्री रेखासाठी धोक्याची घंटा ठरली. रेखाचे साम्राज्य आता जणु संपलेच असे सर्वांना वाटू लागले. 'द वॉशिंग्टन पोस्ट'ची पत्रकार एलिजाबेथ यांनी आपल्या पुस्तकात यासंदर्भातील खुलासा केलाय. 


एकमेकींना टक्कर 


श्रीदेवी नंबर वन असण्याबाबत त्यावेळी त्यांनी रेखाला विचारले. पण त्यावेळी श्रीदेवी नंबर वन नसून खूप साऱ्या नंबर वनपैकी एक असल्याचे रेखाने म्हटले होते. श्रीदेवी आणि रेखा दोघी एकमेकींच्या दबावात असल्याचे पुस्तकात म्हटले आहे.


रेखा एक्झिट घेण्याच्या तयारीत असताना श्रीदेवीची एन्ट्री झाली होती. श्रीदेवी थोडी अपरिपक्व आहे पण वेळेनुसार शिकेल असे रेखाने म्हटले होते. 


आमच्यात वाद नाहीत 


 एलिजाबेथ श्रीदेवीची मुलाखत घेण्यासाठी 'मिस्टर इंडिया'च्या सेटवर पोहोचल्या.  त्यावेळी श्रीदेवीचा मुड ठिक नव्हता. दिग्दर्शक शेखर कपूर तिच्याकडून रात्री ८ वाजेपर्यंत काम करून घ्यायचे. त्यावेळी रेखाबद्दल तिला विचारले गेले.


आमच्यात वाद नसल्याचे सांगत तिने उत्तर टाळले. तसेच वाढलेल्या वजनाबाबतही तिने खुलासा केला. जर बारीक झाले कर साऊथचे प्रेक्षक सिनेमातून कधीच बाहेर फेकतील असे श्रीदेवीने म्हटले होते. 


थोडीफार इंग्रजी शिकली असून मीडियाशी बोलताना आईची मदत घेत नसल्याचेही तिने यावेळी सांगितले होते.