मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना हसवत आहे. शोमधील प्रत्येक कलाकार त्याच्या व्यक्तिरेखेसाठी ओळखला जातो. त्याला खूप लोकप्रियताही मिळाली पण तारक मेहताच्या सोनू म्हणजेच पलक सिधवानीसाठी टीव्ही इंडस्ट्रीत काम करणं सोपं नव्हतं. करिअरच्या सुरुवातीलाच त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पलक सांगते की, ती पीजीमध्ये राहायची. दोन हजार रुपये वाचावेत म्हणून तिने मुंबईतील घर बदललं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तारक मेहताने बदललं आयुष्य 
पलक देखील एक YouTuber आहे. तिच्या ग्राहकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. लॉकडाऊनच्या काळात तिला तिचं यूट्यूब चॅनल सुरू करायचं होतं पण ती ज्या घरात राहते ते असं नव्हतं की, ती तिथे शूट करू शकेल. दिलेल्या एका मुलाखतीत पलक म्हणाली, 'ग्रॅज्युएशनचा अभ्यास संपला होता. मी कास्टिंगचं काम करायचे. मला पैशांची गरज होती.


मी टीव्ही शोसाठी ऑडिशन देणं सुरू केलं आणि तारक मेहतासाठी ऑडिशन दिलं.  शॉर्टलिस्ट झाल्यानंतर मला कॉल येऊ लागले पण काहीच होत नव्हतं. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. जेव्हा मी आशा गमावली तेव्हा अचानक मला 'तारक मेहता' शो मिळाला आणि त्यानंतर माझं आयुष्य बदललं.


पलक पुढे म्हणाली, 'तारक मेहताच्या 6-7 महिन्यांनंतर मी माझे चॅनल सुरू केलं. त्यावेळी मी 1 BHK मध्ये राहत होते. कॉलेजमध्ये असताना मी P.G मध्ये रहायचे.  शो मिळाल्यानंतर आम्ही 1 BHK मध्ये शिफ्ट झालो, मी माझ्या भावाला सांगितलं आता माझा शो सुरु झाला आहे आणि आता मी भाडं देऊ शकते. हा फ्लॅट आम्हाला आमच्या बजेटमध्ये मिळाला. मी माझ्या कुटुंबासह तिथे शिफ्ट झाले.