1 तास मॉलच्या शो रूममध्ये लॉक झाली सनी लिओनी
काय झालं नेमकं?
मुंबई : एका मॉलमध्ये क्लोदिंग ब्रँडचं स्टोर लाँच करण्यासाठी सनी लिओनी गेली असता. एक अजब प्रकार घडला. कारण सनी लिओनीला तेथे येणं एकदम भारी पडलं. सनी लिओनी मॉलमध्ये पोहोचताच लोकांनी मॉलमध्ये गर्दी केली. सनीची एक झलक पाहण्यासाठी तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी माणसांची एकच गर्दी झाली. सनी मॉलमध्ये आल्याची बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी एकच गर्दी केली. ही गर्दी इतकी हाताबाहेर गेली की, माणसांना थांबवण कठीण झालं. आणि सनीला शो रूमच्या बाहेर निघणं कठीण झालं.
गर्दीला घाबरून स्टोरचा मालक आणि डिझायनर रियाज गांजीने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्टोरचं शटर आतून बंद करून घेतलं. कारण लोकांना वाटेल की हे दुकान बंद झालं असून सनी लिओनी इथून गेली आहे. स्टोर धावपळीत 1 तास लॉक राहीलं आणि शटर बंद करताना सेफ्टीचा विचार करता आला नाही आणि सनी आतमध्येच लॉक झाली. तिथे सनीसोबत तिचा नवरा डेनियल देखील होता.
पूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर शटर उघडण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा लक्षात आलं शटर बाहेरून बंद झालं आहे. बराचवेळ प्रयत्न केल्यानंतर मॉलच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं. मॉलचे सर्व शटर ऑटोमॅटिक बंद होतात तसेच ते झालं. आणि सनी जवळपास 1 तास आतमध्ये अडकून राहिली.