मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदाने अपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. चित्रांगदाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून ती दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. सुरुवातीच्या काळात शूटिंगदरम्यान चित्रांगदाला अनेक अनुभव आले. एकदा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इंटीमेट सीनच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने तिच्याकडून अशा काही मागण्या केल्या, ज्यामुळे चित्रांगदा घाबरली आणि तिला चित्रपट सोडावा लागला.
 
खरंतर चित्रांगदा नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत बाबूमोशाय बंदूकबाज या चित्रपटात काम करत होती. या चित्रपटात दोघांमध्ये काही इंटिमेट सीन्स शूट होणार होते. या सीनच्या शूटिंगदरम्यान बराच गोंधळ झाला आणि चित्रांगदाने चित्रपट सोडला, त्यानंतर बराच वाद झाला. स्वतः चित्रांगदाने एका मुलाखतीत हा संपूर्ण किस्सा सांगितला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ती म्हणाली, आम्ही एक इंटिमेट सीन शूट केला होता आणि दिग्दर्शक कुशन नंदीला तो सीन आवडला नाही. त्याला किसिंग सीन 7 सेकंदांनी लांबवायचा होता. तो सीन पुन्हा शूट करण्याची मागणी तो करू लागला आणि मला म्हणाला की, मी नवाजच्या वर बसावं.  मी त्यावेळी पेटीकोट घातला होता यानंतर तो म्हणाला की, पेटिकोट वर उचल आणि नवाजवर बॉडी घास मी त्यावेळी खूप घाबरले होते. 


आम्ही आधीच मॉन्टाज शूट केलं होतं पण कुशानने ते पुन्हा शूट करण्याचा आग्रह धरला. ते सात सेकंद किसींग सीन वाढवण्याचा तो आग्रह करू लागला. इतकंच नाही तर चित्रांगदाने आरोप केला की, की, वाद सुरू असताना कुशन तिच्याशी घाणेरड्या भाषेत बोलला आणि तिला शिवीगाळही केली. तसंच हा सीन पुन्हा शूट करण्याचा दबावही तो टाकत होता, त्यानंतर त्याने चित्रपट सोडला. यानंतर चित्रपटात बिदिता बागला तिच्या जागी घेण्यात आलं आणि शूटिंग पुढे गेलं.


चित्रांगदाने बॉलिवूडमध्ये डेब्यू सुधीर मिश्रा यांच्या 'हजारो ख्वाहिशे ऐसी' या सिनेमातून केलं आहे. त्यावेळी ती विवाहित होती. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतरच ज्योती आणि चित्रांगदा यांच्यात खटके उडायला सुरूवात झाली. 


ज्योतीने पुढे सांगितलं की, आम्ही एकत्र नसणं हे मला खूप त्रासदायक होतं. कारण चित्रांगदा कामामुळे बऱ्याचदा मुंबईतच असायची आणि मी दिल्लीत. मी खूप प्रयत्न करायचो की आम्हाला एकत्र वेळ घालवता येईल. मला त्याकाळात तिची कमतरता खूप जाणवत असे. तिच्याशिवाय घर अगदी रिकामं वाटायचं. 


2013 मध्ये ज्योती आणि चित्रांगदा यांच्यातील नात्यासंबंधी अनेक अफवा समोर आल्या. त्यांच्या नात्यात काहीच आलबेल नसल्याचं म्हटलं जातं होतं पण चित्रांगदाने या सगळ्या गोष्टी नाकारल्या होत्या. अखेर 2014 मध्ये चित्रांगदा आणि ज्योतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर मुलाची जबाबदारी चित्रांगदाकडे सोपवण्यात आली.