डिंपल कपाडीया यांच्यासोबत इंटिमेट सीन शूट करताना विनोद खन्ना यांचा स्वत: वरचा सुटला होता ताबा!
डिंपल कपाडीया यांच्यासोबत एका चित्रपटाच्या सेटवर हा प्रकार घडला होता.
मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी आपण नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो. कधी त्यांचे रिलेशनशिप तर कधी त्यांच्या पार्टींबद्दल ऐकतो. बऱ्याचवेळा सेलिब्रिटींनी केलेल्या काही गोष्टी या चर्चेचा विषय ठरतात. असंच काही तरी अभिनेता विनोद खन्ना यांच्याबाबत घडलं होतं. विनोद खन्ना (Vinod Khanna)हे त्यांच्या दमदार भूमिकेमुळे ओळखले जातात. प्रत्येक चित्रपटातील त्यांच्या भूमिकेन त्यांनी प्रेक्षकांना भूरळ पाडली होती. विनोद खन्ना आणि अभिनेत्री डिंपल कपाडीया यांच्यासोबत चित्रपटाच्या सेटवर असं काही घडलं की ते दोघे सगळीकडे चर्चेचा विषय ठरले होते.
विनोद खन्ना हे अप्रतिम अभिनय करायचे. कोणतीही भूमिका असो ते त्यासाठी 100% द्यायचे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटिमेट सीन सुरु असताना त्यांना अनेकदा सुचना द्याव्या लागत होत्या. महेश भट्ट यांनी विनोद खन्ना यांना जुर्म' आणि 'प्रेम धर्म' या दोन चित्रपटांसाठी साइन केले. 'प्रेम धर्म' या चित्रपटात विनोद खन्ना यांच्यासोबत मुख्य भूमिकेत डिंपल कपाडीया होत्या. चित्रपटा दरम्यान डिंपल आणि विनोद खन्ना यांच्यात असा प्रसंग झाला की विनोद खन्ना हे अखेर अभिनेत्रीची माफी मागत सॉरी म्हणाले. 'प्रेम धर्म' चित्रपटामध्ये विनोद खन्ना आणि डिंपल कपाडीया यांच्यात बेडवरील एक इंटिमेट सीन होता. या सीनममध्ये विनोद खन्ना यांना झोपायच्या आधी डिंपल यांना किस करायचे होते आणि त्यानंतर डिंपल यांना मिठी मारायची होती.
विनोद खन्ना हा सीन शूट करण्यासाठी आले, त्यांनी आपला पोशाख बदलला आणि डिंपल यांच्यासोबत बेडवर त्यांच्या पोजीशनमध्ये थांबले. महेश भट्ट यांनी 'अॅक्शन' म्हणत शूटिंगला सुरुवात केली. विनोद यांनी डिंपल यांना अनेक वेळा किस केलं आणि नंतर त्यांना मिठी मारली. महेश भट्ट यांनी यावेळी आणखी एक शॉट घेण्याचे ठरवले, परंतु यावेळी दृश्याची खोली जाणून घेण्यासाठी एक लॉंग शॉट घेतला. यादरम्यान महेश भट्ट त्यांच्या संपूर्ण टीमसह काही अंतरावर गेले. सीनच्या शूटिंगदरम्यान विनोद खन्ना यांनी त्यांच्या सूचनांचे पालन केले आणि डिंपलला किस करायला सुरुवात केली. विनोद खन्ना यांनी डिंपल यांना मिठी मारताच महेश भट्ट कट म्हटले. मात्र, त्याचा आवाज विनोद खन्ना यांच्यापर्यंत पोहोचला नाही आणि विनोद डिंपल यांना मिठी मारून किस करत राहिले. (when vinod khanna lost his control over dimple kapadia during bedroom scene while shooting)
विनोद यांनी डिंपल यांना घट्ट पकडले. विनोद खन्ना यांना असे पाहून डिंपल यांनाही आश्चर्य वाटले. डिंपल यांनी दिग्दर्शकाची मदत घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण काही समजण्याआधीच विनोद हे थांबले नाही. शेवटी महेश भट्ट आणि त्यांचे काही सहाय्यक सेटवर पोहोचले आणि अनेक वेळा 'कट, कट, कट' ओरडले. पूर्णपणे हादरलेल्या डिंपलला विनोद शेवटी सोडले. डिंपल कपाडीया या मेकअप रूमकडे धावल्या. त्यानंतर महेश भट्ट यांनी विनोद खन्ना यांच्याशी याबाबत चर्चा केली. रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक महेश यांनी विनोद यांना डिंपलची माफी मागायला लावली.