Devara : सध्या जूनियर एनटीआर त्याच्या 'देवरा' चित्रपटाच्या रिलीजमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'RRR'च्या यशानंतर जूनियर एनटीआरचे चाहते त्याच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. अशातच आता त्याचा 27 सप्टेंबरला 'देवरा' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'देवरा' हा चित्रपट त्याचा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. जूनियर एनटीआरच्या या चित्रपटाबाबत अनेक राज्यांमध्ये प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे चाहते चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगची तारीख आता समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सरकारकडून तिकिटांच्या किमती वाढवण्याबाबत मंजुरी मिळाल्यानंतर सोमवारपासून म्हणजेच 23 सप्टेंबरपासून अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याशिवाय चाहत्यांमधील चित्रपटाची क्रेझ पाहता या चित्रपटाचा शो देखील रात्री 1 वाजता होणार आहे. मात्र, हा शो मर्यादित स्क्रीनवरच उपलब्ध असणार आहे. 


अमेरिकेत 'देवरा' चित्रपटाची प्रचंड क्रेझ


जूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटाची क्रेझ देशाबरोबरच परदेशातही बघायला मिळत आहे. 'देवरा' चित्रपटाने अमेरिकेत एक नवीन ट्रेंड सेट केला आहे. दोन दिवसांपूर्वी 'देवरा' च्या इन्स्टाग्राम पेजवर केलेल्या पोस्टनुसार अमेरिकेत अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या विक्रीमध्ये नवा विक्रम केला आहे. या चित्रपटाची 50 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. 



एका मुलाखतीत जूनियर एनटीआरने असा दावा केला होता की चित्रपटाची शेवटची 40 मिनिटे सर्वांना हादरवून टाकतील. या चित्रपटासाठी जूनियर एनटीआरने 38 दिवस पाण्याखाली आणि जवळपास 60 दिवस पाण्याबाहेर शूट केल्याचे सांगितले होते. या चित्रपटातील काही अॅक्शन सीन्स असे आहेत की तुम्ही ते कदाचित कधी पाहिले नसतील. 


जान्हवीचा साउथ डेब्यू चित्रपट


जूनियर एनटीआरसोबत या चित्रपटामध्ये सैफ अली खान आणि जान्हवी कपूर देखील आहेत. या चित्रपटातून जान्हवी कपूर साउथमध्ये डेब्यू करत आहे. जूनियर एनटीआर या चित्रपटात दुहेरी भूमिकेत आहे. यामध्ये वडिलांचे एक आणि मुलाचे एक पात्र आहे. यासोबतच प्रकाश राज, शाइन टॉम चाको, श्रीकांत, मुरली शर्मा आणि श्रुती मराठे या कलाकारांचा समावेश आहे.