मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. राणी मुखर्जीने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. राणी मुखर्जीने तिच्या करिअरमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, एकदा यश चोप्राने राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना एका खोलीत बंद केलं होतं. एवढंच नाही तर त्याने राणीला धमकीही दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणी मुखर्जीने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. राणीने तिच्या मुलाखतीत हा प्रसंग सांगितला आहे राणी म्हणाली की, 'मुझसे दोस्ती करोगे' चित्रपट केल्यानंतर ती सगळ्या चित्रपटांना नाही म्हणू लागली होती. तिने सांगितलं की, तिला ऑफर केलेला कोणताही चित्रपट ती नाकारायची. अशाप्रकारे तिने चित्रपटांपासून दूर राहून जवळपास 8 महिने झाले होते.


तिने सांगितलं की यादरम्यान राणी मुखर्जीच्या करिअरच्या समाप्तीबद्दल मीडियामध्ये तिच्याबद्दल अनेक गोष्टी पसरू लागल्या. राणी मुखर्जीने पुढे सांगितलं की, तिने विचार केला होता की, ती फक्त तिच्या आवडीच्या कामासाठी होकार देईल. त्याच दरम्यान तिला 'साथिया'ची ऑफर आली. यश चोप्राचा संदर्भ देत ती म्हणाली, यश काकांनी माझ्या आई आणि वडिलांना त्यांच्या ऑफिसबाहेर बोलावलं.


पण जेव्हा यश चोप्राला चित्रपटासाठी नकार देण्यासाठी ती ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा यश काकांनी मला बोलावलं आणि म्हणाले, बेटा, तू खूप मोठी चूक करत आहेस. ते पुढे म्हणाले की, मी दाराला कुलूप लावत आहे आणि जोपर्यंत तू हो म्हणत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या आई-वडिलांना ईथून जाऊ देणार नाही. यासाठी ती यश चोप्रांची आभारी असल्याचं राणी म्हणाली, त्यांनी असं करुन खूप चांगलं काम केलं.