Where is CID Doctor Sarika: लहानपणापासून आपल्या सर्वांचीच लाडकी मालिका कोणती असं विचारलं तर 'सीआयडी'चेच नावं पुढे येते. लहानपणापासूनच आपण ही मालिका पाहिली आहे. या मालिकेतील अनेक पात्र ही आपल्या आवडीची आहेत. आता ही मालिका संपून बरीच वर्षेही झाली आहे. परंतु या मालिकेत (CID Serial) अनेक पात्र ही आपल्या मनात घर करून आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला माहितीये का डॉ. सांळूखे यांच्यासोबत काम करणारी लॅबरोटेरियन डॉ. तारिका सध्या काय करते? जिच्यावर इन्स्पेक्टर अभिजित लाईनही मारायचे. सध्या तिचे काही फोटो हे व्हायरल झाले आहेत. डॉ. तारिका अजिबातच बदलली नाही आणि ती आहे तशीच आहे. परंतु तुम्हाला हे माहितीये का की ती सध्या काय करते? (where is dr sarika from cid what is is doing know the latest news and photos about her)


90 च्या दशकात आलेल्या 'सीआयडी' या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली होती. गेल्या वीस वर्षात या मालिकेनं प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळवली. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांच्या भुमिका, त्यांचे संवाद आणि डायलॉग्जही प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर सोशल मीडिया आल्यानंतर मात्र 'सीआयडी' या मालिकेवर मीम्सही (CID Serial Memes) तयार होऊ लागले होते. त्यानंतर हे मीम्स इतके व्हायरल झाले की, त्यामुळे या मालिकेच्या लोकप्रियतेतही मोठी वाढ झाली होती. 'कुछ तो गडबड हैं दया' हा संवाद तर प्रचंड व्हायरल झाला होता. 


हेही वाचा - VIDEO: अजय देवगणची ऑनस्क्रीन मुलगी होणार आई; पाहा Pragnancy Photoshoot


प्रत्येक सिरियलमध्ये असेच काही कलाकार असतात जे लोकांच्या मनात घर करून जातात आणि मग मालिका बंद झाली की नक्की हे कलाकार करतात तरी काय यामध्ये प्रेक्षकांना रस असतोच. 'सीआयडी'मधील डॉ. तारिका यांच्याबद्दल ऐकले की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे लांबसडक उंचीची, कुरळे केस असणारी सुंदर डॉक्टर. या मालिकेत ती एक फॉरेन्सिक एक्सपर्ट होती. परंतु आता ती आपल्या करिअरमध्ये पुढे गेल्या असून तिनं अभिनय सोडला आहे. परंतु ती सोशल मीडियावर सक्रिय आहेत. तिचे खरं नावं श्रद्धा मुसळे आहे आणि ती लोकांचे भविष्य सांगते.  



श्रद्धा मुसळे हिनं अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांतून भुमिका निभावल्या आहेत. मध्यंतरी तिनं आपल्या सीआयडी मालिकेतील इतर कलाकरांबरोबर एक रियुनियनही केलं होते आणि त्यांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. श्रद्धा मुसळे हिनं अभिनय सोडला आहे परंतु आजही ती आपल्या सीआयडी मालिकेसाठी ओळखल्या जातात.