मुंबई : बॉलिवूडमध्ये नावारुपास यावं असं प्रत्येक कालकाराचं स्वप्न असतं. प्रत्येकालाच प्रकाशझोतात येत प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळवण्याची इच्छा असते. अनेकांची ही इच्छा साध्य झाली आहे. पण, काहीजणांना मात्र या झगमगणाऱ्य़ा जगतामध्ये तग धरणं तितकं जमलं नाही. ज्यामुळे काही चेहरे पदार्पणानंतर लगेचच दिसेनासेही झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच चेहऱ्यांमधील एक नाव म्हणजे पूजा बत्रा. सध्या पूजा चित्रपटांच्या दुनियेत सक्रिय नाही. पण, तरीही ती अनेकांना हेवा वाटेल असंच आयुष्य जगत आहे. 


वयाची 45 वर्षे पूर्ण झालेल्या या अभिनेत्रीचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे झाला होता. मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेत पहिलं स्थान मिळवल्यानंतर पूजानं मॉडेलिंग क्षेत्रात आणखी नाव कमवलं. 


250 हून अधिक मॉडेलिंग शो केल्यानंतर तिनं काही जाहिरातीही केल्या. सुरुवातीच्या काळात तिनं चित्रपट जगतामध्ये पदार्पण न करता शिक्षण पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं. 


'विरासत' या चित्रपटातून पूजानं पदार्पण केलं आणि चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर भाई', 'हसीना मान जाएगी', 'कही प्यार ना हो जाए', 'नायक' या चित्रपटांतून ती झळकली. 


2009 मध्ये तिन स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस सुरु केलं. हॉलिवूडच्या Sylvester Stallone आणि Denise Richards या चेहऱ्यांना अक्षय कुमार आणि करीना कपूरच्या 'कम्बक्त इश्क' या चित्रपटांमध्ये आणण्याचं श्रेय पूजालाच जातं. 


'Mera Sangeet-LA' या अमेरिकेतील हिंदी रेडिओ वाहिनीसाठी ती प्रोडूसर्सपैकीच एक पार्टनर आहे. 2021 च्या अहवालानुसार पूजाचं वार्षिक उत्पन्न  $1 million ते $7 million इतकं असावं. मुंबई आणि लॉस एंजेलिसमध्ये या अभिनेत्रीची घरंही आहेत. 


कलाविश्वात पूर्णपणे सक्रिय नसली तरीही पूजा इतर मार्गांनी मात्र अर्थार्जनाच्या बाबतीत अग्रेसर दिसत आहे.