मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या मुंबईत तिने हाती घेतलेले प्रोजेक्ट पुर्ण करत आहे. याचबरोबर रश्मिका रणबीर कपूरसोबत तिच्या आगामी हिंदी प्रोजेक्ट्स 'एनिमल'साठी शूटिंग करत आहे. तसंच तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'गुडबाय' डब करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रश्मिकाच्या जवळच्या मित्राने केला हा खुलासा 
अभिनेत्रीच्या जवळच्या एका सूत्राने सांगितलं की, 'रश्मिका सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या ती मुंबईत आहे. अभिनेत्री सध्या मुंबई शहरात 'एनिमल'चं शूटिंग करत आहे." आणि दोन्ही चित्रपटांमध्ये समन्वय साधणार आहे."


रश्मिकावर किती कामाचा ताण आहे?
वर्क फ्रंटवर बोलायचं झालं तर, रश्मिका सध्या 'एनिमल' आणि 'गुडबाय' व्यतिरिक्त,   'पुष्पा' 2, सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' आणि विजय थलापट्टीसोबत 'वरिसु'चा सिक्वेल करत आहे. रश्मिका  ही एक अशी अभिनेत्री आहे. जी लाखो भारतीयांच्या हृदयावर राज्य करते. रश्मिका प्रामुख्याने तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये दिसते. तिचे चित्रपट लोकांना खूप आवडतात. लोकांनी तिच्या पुष्पाला भरभरून प्रेम दिलं.


रश्मिकाला भारतीय मीडिया आणि अनेक लोकं 'कर्नाटक क्रश' म्हणून ओळखतात. मात्र, याचा अर्थ रश्मिका फक्त कर्नाटकापुरतीच मर्यादित आहे. तर असं नाही. देशाच्या विविध भागात राहणाऱ्या लोकांसाठी अभिनेत्री त्यांची क्रश आहे.