IND vs SA Final: मिलर, क्लासेनला अश्रू अनावर; फायनलमधील पराभवानंतर द.आफ्रिकेचे खेळाडू भर मैदानात रडले

IND vs SA Final: दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकला. टीम इंडिया 17 वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये चॅम्पियन बनली. 

| Jun 30, 2024, 11:50 AM IST
1/7

टीम इंडियाच्या चाहत्यांचं स्वप्न अखेर शनिवारी रात्री रोहित शर्माने पूर्ण केलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप 2024 जिंकला. 

2/7

वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू फार खूश होते आणि मैदानात सेलिब्रेशन करताना दिसले.

3/7

एकीकडे भारताच्या खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही पराभवामुळे अश्रू अनावर झाले होते. 

4/7

यावेळी पराभवानंतर बरेच आफ्रिकन खेळाडू रडताना दिसले. 

5/7

शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याच्या चेंडूवर डेव्हिड मिलर बाद झाला. त्याला सामना पूर्ण करता आला नाही.  यावेळी मिलरला त्याची पत्नी कॅमिला हॅरिसने मिठी मारली होती. 

6/7

शिवाय कर्णधार एडन मार्कराम आणि हेनरिक क्लासेनसारखे खेळाडूही रडत होते. 

7/7

या सामन्यात क्लासेनने शानदार अर्धशतक ठोकले, पण तो टीमला वर्ल्डकप जिंकवून देऊ शकला नाही.