`रसोड़े में कौन था?` फेम राशी सध्या काय करतेय?
किचनमध्ये रिकामा कुकर ठेवल्याबद्दल राशीला कोकिला ओरडते.
मुंबई : 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील राशी सध्या चर्चेत आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे तिने लक्षवेधून घेतलं आहे. ज्यात कोकिलाबेन सून गोपी हिला विचारत आहेत की रसोड़े में कौन था? सांगायचे तर, या मालिकेत बोलला जाणारा हा एक सामान्य संवाद आहे, ज्यामध्ये सासू कोकिलाबेन मोदी तिच्या दोन्ही सुनांचा क्लास घेताना दिसत आहे.
किचनमध्ये रिकामा कुकर ठेवल्याबद्दल राशीला कोकिला ओरडते. मात्र या संवादाला ज्या प्रकारे रॅप गाण्याचे रूप देण्यात आले, त्यामुळे सर्वांनाच त्या व्हायरल व्हिडिओचे वेड लागले आहे.
'रसोड़े में कौन था?' या प्रश्नावर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. सर्व सेलिब्रिटी आपापल्या परीने प्रतिक्रिया देत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचनमध्ये रिकाॉमा कुकर ठेवणाऱ्या रुचा हसबनीसची प्रतिक्रिया होती.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना रुचाने ‘वो मैं थी’ असे लिहिले आहे. रुचाच्या या पोस्टवर अदा खानची प्रतिक्रिया देखील आली 'राशी बेबी यू ट्रेंडिंग वाह...'
या व्हायरल व्हिडिओमुळे रुचा हसबनीस पुन्हा एकदा चर्चेत आली. मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी एका व्हायरल व्हिडिओमुळे सर्व कलाकार पुन्हा एकदा घराघरात चर्चेत आले. त्यानंतर आता राशी नक्की काय करतेय असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
पण आता 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील राशी कुठे आहे, ती कुठे राहते आणि मालिकेच्या जगातून ती अचानक का गायब झाली? हे अनेकांना जाणून घ्यायचे आहे. बोललं जात आहे की, रुचा सध्या तिच्या वैवाहिक जीवनात व्यस्त आहे. रुचा एका मुलीची आई झाली आहे.
रुचाने 2010 मध्ये आपल्या मुलीला जन्म दिला आणि ती सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. रुचा आपल्या लहान कुटुंबासह मुंबईतच राहते. सध्या ती लाईमलाईट पासून लांब असल्याचं बोललं जात आहे.