Jay Shri Krishna Serial Child Artist: टेलिव्हिजन क्षेत्र सुरू झाल्यापासून अनेक बालकलाकार आपल्यासमोर आले त्यातील काही कलाकार हे मध्येच अभिनय सोडून आपल्या दुसऱ्या करिअरमध्ये स्थिरावले आहे. आपल्या लहानपणी अनेक मालिका या लोकप्रिय होत्या. त्यातीलच एक म्हणजे जय श्री कृष्णा ही मालिका. या मालिकेतील तुम्हाला तो छोटा कान्हा आठवतोय का? तुम्हाला कदाचित माहिती नसेल परंतु या लहान कान्हाची भुमिका एका मुलीनं केली होती. ही लहान मुलगी आता मोठी झाली असून सध्या तिचे इन्टाग्रामवरचे फोटो व्हायरल झाले आहेत. ती इन्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असून आपले अपडेट्सही ती इन्टाग्रामवर शेअर करताना दिसते. त्यामुळे सध्या तिची बरीच चर्चा रंगली आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की सध्या ती काय करते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेलिव्हिजनवर जय श्री कृष्णा ही मालिका तेव्हा प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाली होती. त्यावेळी श्री कृष्णा यांची बालपणीची भुमिका ज्या चिमुरडीनं केली होती तिचं नावं आहे ध्रिती भाटिया. ध्रिती आता फार मोठी झाली आहे आणि ती आपल्याला क्षेत्रातही चांगलीची सक्रिय आहे. 2 वर्षांची असताना तिनं ही भुमिका निभावली होती. त्यावेळी तिच्या क्यूटनेसनं तिनं सगळ्यांनाच घायाळ केलं होतं. त्यावेळी तिच्या हलक्या कोमल आवाजानं, क्यूट चेहऱ्यानं आणि गोंडस स्माईलनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. तिच्या या गोड अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.  आता मोठी झाल्यावरही ध्रिती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसते आहे. सध्या ती इन्टाग्रामवरून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. 


हेही वाचा - 'आई कुठे काय करते' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्यानं ठाण्यात सुरू केलं हॉटेल, चहा बनवतानाचा Video केला शेअर 


2008 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तेव्हा ती ध्रिती ही दोन वर्षांची होती. आता ती 16 वर्षांची झाली आहे. बालकृष्णाच्या भुमिकेत ती फारच सुंदर दिसत होती त्याचसोबत तिच्या अभिनयानंही तिनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. तिचा लुक आता चांगलाच बदलला असू हिचं ती लहानगी ध्रिती आहे का यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. त्यावेळी तिच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली असल्यानं त्यानंतरही ती वेगवेगळ्या भुमिकांमधून प्रेक्षकांसमोर आली होती. 



आज या मालिका बंद झाल्या असल्या तरीसुद्धा या मालिकांची क्रेझ कायम आहे. त्यामुळे या मालिका या प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहतात. त्यामुळे या मालिका परत परत पाहाव्याशा वाटतात. तुम्ही तिचे फोटो पाहिलेत का?