मुंबई : पनामा पेपर्स लीक प्रकरणात ऐश्वर्या राय बच्चनची चौकशी करण्यात आली होती. पनामास्थित या लॉ फर्मच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी चार कंपन्या स्थापन केल्याचा आरोप आहे. ते स्वतः या कंपन्यांचे संचालक होते. यापैकी तीन कंपन्या बहामासमध्ये नोंदणीकृत होत्या आणि एक ब्रिटिश व्हर्जिन बेटावर आधारित होती.


ऐश्वर्या राय बच्चनवर का आहेत आरोप? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चारही कंपन्या कर वाचवण्यासाठी 1993 मध्ये स्थापन केल्याचा आरोप आहे. ज्यांचे बाजारमूल्य कोट्यवधी रुपये आहे. ज्या कंपन्यांमध्ये अमिताभ बच्चन संचालकपदावर होते. त्या कंपन्या कोट्यवधी रुपयांच्या जहाजांचा व्यवसाय करत होत्या, मात्र नंतर त्यात ऐश्वर्या राय बच्चनचा प्रवेश करण्यात आला, असा आरोप आहे.



लग्ना अगोदरच ऐश्वर्या बनली अमिताभ बच्चन यांच्या कंपनीची संचालक 


2005 मध्ये, व्हर्जिन आयलंडमध्ये नोंदणीकृत कंपनी, अमिताभ बच्चन यांच्या जागी ऐश्वर्या राय बच्चनला संचालक करण्यात आले. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचे लग्नही झाले नव्हते. 20 एप्रिल 2007 रोजी दोघांचे लग्न झाले. पण आधी ऐश्वर्याची आई, वडील आणि भाऊ या कंपनीत भागीदार बनले होते आणि 2007 पर्यंत ऐश्वर्या राय बच्चन स्वतः या कंपनीत शेअरहोल्डर बनल्याचा आरोप आहे. आणि वर्षभरानंतर ही कंपनी बंद पडली.