कोण आहे अपूर्व मेहता, ज्याच्या वाढदिवसाला सेलिब्रिटींची गर्दी
पाहा सेलिब्रिटींसाठी इतकं खास आहे तरी होण?
मुंबई : सेलिब्रिटी पार्टी म्हटलं की तिथे येणाऱ्या इतर सेलिब्रिटींचे लूक म्हणजे चर्चेचा विषय. आतापर्यंत सहसा सेलब्रिटी पार्टीमध्ये कुणा एका कलाकाराच्या घरी आयोजित केली जाणारी पार्टी किंवा एखाद्या खास सेलिब्रेशनसाठीची पार्टी असाच आपला समज होतो. (Bollywood Celebs )
पण, नुकतीच एक अशी वाढदिवसाची पार्टी पार पडली जिथं, करण जोहर, काजोल, जान्हवी कपूर, आर्यन खान, तारा सुतारिया या आणि इतर बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
एखाद्या रेड कार्पेटवर यावं तशा सर्व अभिनेत्री या पार्टीसाठी आल्या आणि त्यांनी सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला. बच्चन कुटुंबीयांपासून ते अगदी कपूर कुटुंबीयांपर्यंत, सर्वांनीच या पार्टीसाठी हजेरी लावली.
आता राहिला प्रश्न ही पार्टी नेमकी कोणासाठी आयोजित करण्यात आली होती?
तर, ही पार्टी होती, अपूर्व मेहता याच्या वाढदिवसाची. अपूर्व मेहता हा कधी चित्रपटांमध्ये झळकला नाही, तो सतत माध्यमांसमोरही नसतो मग का बरं हे सेलिब्रिटी त्याच्यासाठी आले?
तर, धर्मा प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर अपूर्व मेहता कार्यरत आहे. भारतीय चित्रपट जगतामध्ये धर्मा प्रॉडक्शनचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही.
याच धर्मासाठी महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या आणि लाखामोलाची कामगिरी करणाऱ्या अपूर्व मेहताच्या 50 व्या वाढदिवसासाठी सेलिब्रिटींनी गर्दी केली होती.
प्रत्येक सेलिब्रिटीचा अंदाज यावेळी पाहण्याजोगा होता. काय काय पाहावं आणि कुठे कुठे पाहावं असंच इथं येणाऱ्या सेलिब्रिटींकडे पाहून वाटत होतं.
सोशल मीडियावर या पार्टीदरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.