मुंबई : नुकताच प्रदर्शित झालेला काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणाऱ्या विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहून अनेकांना गहीवरून आलं. आपल्या जवळच्या व्यक्तींचा त्रास त्यांनी अनुभवला. काश्मिरी पंडितांचे दुःख पडद्यावर पाहणे सोपे नाही, असे हा चित्रपट पाहणाऱ्यांचा अनुभव आहे. 


बिट्टा कराटेची 'ती' मुलाखत चर्चेत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटात 1990 मध्ये काश्मीरमध्ये झालेला नरसंहार आणि काश्मिरी पंडितांवर झालेला हृदयद्रावक अत्याचार पडद्यावर दाखवण्यात आला आहे.



चित्रपटात अशीही एक मुलाखत आहे, जी ऐकून कोणाचाही आत्मा हादरून जाईल. सत्यकथा सांगणाऱ्या या चित्रपटात बिट्टा कराटे नावाच्या व्यक्तीची मुलाखत आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.


चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बिट्टा कराटे नावाच्या व्यक्तीची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. कोण आहे बिट्टा कराटे? ज्याने स्वत: 20 लोकांना मारल्याची कबुली मुलाखतीत दिली होती.


पहिलं मान्य केलं मात्र नंतर नाकारलं 


बिट्टा कराटेचा एक व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने स्वतः काश्मिरी पंडितांना मारल्याची कबुली दिली आहे.


बिट्टा कराटे म्हणतो की, त्याने सुमारे 20 लोकांची हत्या केली, ज्यात बहुतेक काश्मिरी पंडित होते. व्हिडिओमध्ये, बिट्टा जेव्हा लोकांना मारण्याबद्दल बोलतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर किंचितही दुःख दिसत नाही. व्हिडिओमध्ये बिट्टा म्हणतो की, त्यांना मारण्याचे आदेश मिळायचे.


त्यांनी सांगितले असते तर आई आणि भावाचीही हत्या केली असती. बिट्टा कराटे उर्फ ​​फारुख अहमद दार हे आजच्या काळात जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) चे अध्यक्ष आहेत.


1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडानंतर बिट्टा कटरे यांनी राजकारणात प्रवेश केला. या मुलाखतीत बिट्टा कटारे यांनी हत्याकांडातील सर्व आरोपांची कबुली दिली होती, मात्र नंतर त्यांनी त्यांच्याकडून पाठ फिरवली.