Who is Deb Mukherjee: नवरात्र आणि दसऱ्याच्या निमित्तानं सध्या बॉलिवूड सेलिब्रेटींनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा होती. अभिनेत्री काजोल आणि तिची बहीण तनिषा मुखर्जी दरवर्षी नवरात्रीनिमित्त देवीच्या दर्शनासाठी हजर असतात. दरवर्षीप्रमाणे एक काकाही त्यांच्यासोबत हजर असतात आणि भेट झाल्यावर त्यांना मिठी मारतात. एकदा तर या काकांनी काजोलला पाठून प्रचंड घट्ट पकडले होते. तिचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता. त्यावरून तिला आणि त्या काकांना ट्रोलही करण्यात आले होते. सध्या त्यांचे व्हिडीओच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये यांची जोरात चर्चा रंगते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की हे काका नक्की आहेत तरी कोण? काही दिवसांपुर्वी हे काका पुन्हा एकदा दिसले होते. यावेळी तनिषा त्यांना मिठी मारायला गेली त्यांनी एकमेकांना मिठीही मारलीही परंतु काकांना तर चक्क तनिषाला एग्नॉरचं केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यांचे नावं हे देब मुखर्जी. ते स्वत: कलाकार आहेत आणि अभिनेते आहेत. त्यांनी 70-80 च्या दशकात अनेक हिंदी चित्रपटांतूनही कामं केली आहेत. त्यांचे हल्ली अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून अभिनेत्रींना कायमच ते मिठी मारताना दिसतात. सध्या त्यांचा किआरा अडवाणीसोबतचाही एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावेळी त्यांना या व्हिडीओवरून ट्रोलही करण्यात आले आहे. अशातच आता त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. कियारा अडवाणीसोबतच ते काजोलची बहीण तनिषा मुखर्जीसोबतही दिसले होते. त्यातून त्यांची बरीच चर्चाही रंगलेली होती. यावेळी त्यांना पाहिल्यावर तनिषा त्यांना भेटायला पुढे गेली. तिनं त्यांना मिठीही मारली परंतु यावेळी त्यांनी मात्र तिला प्रचंड एन्गॉर केले जे कॅमेऱ्यात कैदही झाले. 


हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचा शाही साखरपुडा, पाहा होणार नवरा कोण आहे?


देब बॅनर्जी यांनी बॉलिवूडमध्ये फारसे चित्रपट केले नाहीत. त्यांनी 18 चित्रपटांतून कामं केली आहेत. त्यानंतर त्यांनी अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला. त्यांचा शेवटचा चित्रपट हा शाहिद कपूरसोबत होता. त्यांनी तू मेरी जिंदगी, एक बार मुस्कुरा दो, अधिकार, आंसू बन गए फूल, जो जीता वही सिंकदर अशा चित्रपटांतून प्रमुख भुमिका केल्या आहेत. त्याचसोबत त्यांनी अनेक चित्रपट हे प्रोड्यूसही केले आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यांनी दोन वेळा लग्न केले आहे. त्यांची पहिली पत्नी मनिषा याही अभिनेत्री होत्या. मनीषा आणि देब मुखर्जी यांची मुलगी ही आशुतोष गोवारीकर यांची पत्नी आहे. त्यांचे दुसरे लग्न हे अमृत यांच्याशी झाले. अयान मुखर्जी हा त्यांचा दुसऱ्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे. अयान मुखर्जी हे फारच लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. ब्रह्मास्त्र हा त्यांचा लोकप्रिय चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला होता.