Reena Rai | अपघातात मृत्यू झालेल्या दीप सिद्धूची गर्लफ्रेंड रिना राय कोण आहे?
पंजाबी गायक-अभिनेता दीप सिद्धूचा कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
मुंबई : पंजाबी गायक-अभिनेता दीप सिद्धूचा कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. दीपचा रोड एक्सिडंटमध्ये मृत्यू झाल्याने पंजाबी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. दीपच्या मृत्यूने त्याच्या मित्र-मंडळींना धक्का बसला आहे. तर त्याच्या गर्लफ्रेंडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातावेळी दीपची गर्लफ्रेंड रीना राय त्याच्यासोबत होती.
रीना कारमध्ये त्याच्या बाजूला बसली होती. ज्या बाजूला रीना बसली होती. तिथे फारसं नुकसान झालं नाही. असं बोललं जात आहे की, कारचा अपघात होताच रीना रायची एअरबॅग उघडली आणि ती बचावली. रीनाने सीट बेल्टही लावला होता. दीपची बाजूची एअरबॅगही उघडली असली तरी अपघातामुळे ती फुटली आणि त्यामुळे दीपचा जीव वाचू शकला नाही.
रीना रायबद्दल बोलायचं झालं तर दीप सिद्धूची गर्लफ्रेंड रीनाही पंजाबी अभिनेत्री आहे. रीनाने तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिलं आहे की, तिने 2014 साली मिस साऊथ एशियाचा किताबही जिंकला आहे. रीना आणि दीप यांनी 2018 साली पंजाबी चित्रपट 'रंग पंजाब'मध्ये काम केलं होतं. नुकताच या दोघांचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्याचं नाव 'देसी' आहे. पण हा चित्रपट पाहण्यासाठी दीप आता या जगात नाही.
दीप सिद्धूची गर्लफ्रेंड रीना राय 13 जानेवारीला अमेरिकेतून भारतात आली होती आणि दोघंही गुरुग्राममधील हॉटेलमध्ये थांबले होते. 14 फेब्रुवारीला दोघांनीही व्हॅलेंटाइन डे एकत्र साजरा केला. रीना सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप सिद्धूच्या गर्लफ्रेंडच्या केलेल्या चौकशीत आतापर्यंत ही गोष्ट सांगितली आहे. अपघात झाला तेव्हा तिचा डोळा लागला होता. अपघात एवढा भीषण होता की स्कॉर्पिओ कार सुमारे 25 ते 30 मीटर फरफटत गेली.