मुंबई : सुभाष घई यांच्या गाजलेल्या ‘खलनायक’ सिनेमाचे आजही मोठे चाहते आहेत. यातील संजय दत्त याची भूमिका फारच गाजली होती. आजही संजय दत्तचं त्या भूमिकेसाठी कौतुक केलं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या सिनेमाचा रिमेक तयार होणार आहे. ‘खलनायक’ सिनेमाचा रिमेक ‘खलनायक रिटर्न’ या नावाने येणार आहे. 


प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साली हे ‘खलनायक रिटर्न’ करत आहेत. आता त्यांच्यासमोर संजय दत्तने खलनायकमध्ये वठवलेल्या भूमिकेसाठी दोन अभिनेत्यांची नावे आहेत. एक म्हणजे रणवीर सिंह आणि दुसरं म्हणजे रणबीर कपूर. रणबीर कपूरने आधी राजू हिराणी यांनी दिग्दर्शित केलेल्या संजय दत्तच्या आयुष्यावरील सिनेमात काम केलंय. 


तर रणवीर सिंह याने संजल लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’मध्ये अलाउद्दीन खिलजीची भूमिका केली आहे. आता या दोघांपैकी कोणाची या सिनेमासाठी निवड होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. कारण दोन्ही अभिनेते सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.  एकाने संजय दत्तची भूमिका आधीच साकारली आहे तर एकाने नाही. आता कोण खलनायक ठरणार हे येत्या काळात कळेलच.