मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिंदी सिनेसृष्टीतली प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. तिच्या चाहत्यांची संख्या सुद्धा अगणित आहे. 'रेफ्युजी' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणारी बेबो आताच्या घडीची टॉप अभिनेत्री आहे. करिनाने अभिनेता आणि पतौडी नवाब सैफ अली खान सोबत लग्न गाठ बांधली आहे. त्या दोघांना एक मुलगा तैमूर आहे. करिना सध्या एका रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमादरम्यान तिने तिच्या लहानपणी असलेल्या क्रशचा खुलासा केला. त्यावेळेस ती 'आशिकी' फेम अभिनेता राहूल रॉयसाठी  प्रचंड वेडी होती. करिनाने 'आशिकी' चित्रपट तब्बल ८ वेळा पाहिला. एवढेच नाही तर ९०च्या दशकात अलेल्या 'आशिकी'ला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. 


सध्या करिना तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. नुकताच झालेल्या 'लॅक्मे फॉशन वीक विंटर २०१९' मध्ये तिने आपला जलवा दाखवला. कळ्या रंगाच्या गाऊनमध्ये रॅम्पवॉक करताना उपस्थितांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.