Akshay Kumar Son Aarav Bhatia With Naomika Saran : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) यांनी बऱ्याचवेळा पापाराझी कुठे ना कुठे स्पॉट करतात. नुकताच ट्विंकल आणि तिची लाडकी लेक निताराचा (Nitara) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत गोंडस निताराला पापाराझींनी आईसोबत स्पॉट केले. दरम्यान आता अक्षय आणि ट्विंकलचा मुलगा आरव भाटिया (Aarav Bhatia) चर्चेत आला आहे. आरव हा कॅमेऱ्यापासून लांब राहतो. असं खूप कमी वेळा होतं जेव्हा आरवला कुठे स्पॉट करण्यात येतं. नुकतेच आरवचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये आरव एका मुलीसोबत दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की मुलगी कोण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरवसोबत दिसणाऱ्या या मुलीचे नाव नाओमिका सरन (Naomika Saran) आहे. नाओमिका ही ट्विंकल खन्नाची चुलत बहिण आणि अभिनेत्री रिंकी खन्नाची (Rinki Khanna) मुलगी आहे.  आरव हा 20 वर्षांचा आहे तर नाओमिका ही 18 वर्षांची आहे. नाओमिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आरवसोबत एक सेल्फी शेअर केली आहे. या फोटोत आरवनं इंडिगो रंगाचं शर्ट आणि नेकलेस घातल्याचे दिसत आहे. तर नाओमिकानं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये नाओमिकानं शेल इमोटीकॉन वापरलं आहे. 



आरव आणि नाओमिकाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'आरव भाऊचा इन्स्टा आयडी द्या किंवा इतकं तरी सांगा की तो बॉलिवूडमध्ये कधी एण्ट्री करणार आहे?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला तुम्हाला दोघांना बॉलिवूडमध्ये पाहायचं आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'आरव हा त्याचे आजोबा राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यासारखा दिसतो.' नेटकऱ्यांनी अशा अनेक कमेंट केल्या आहेत.  



कोण आहे रिंकी खन्ना


नाओमिका ही रिंकी खन्ना आणि समीर सरन यांची मुलगी आहे. रिंकी ही दिवंगत अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची धाकटी मुलगी आहे. रिंकीनं 1999 मध्ये 'प्यार में कभी कभी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि 'जिस देश में गंगा रहता है', 'मुझे कुछ कहना है', 'ये है जलवा', 'झंकार बीट्स' आणि 'झंकार बीट्स' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. चमेली' मध्ये काम केले ट्विंकलप्रमाणेच तिनेही चित्रपटसृष्टी सोडली आणि सध्या ती आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये राहते.


हेही वाचा : 'वडा-पाव किंवा भजी लावा, पण माझ्या लेकीचा फोटो नको...', Alia Bhatt ची पापाराझींकडे मोठी मागणी


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समितमध्ये अक्षय पाहुणा होता. आरवला विचारले असता त्याने सांगितले की, मला चित्रपटात किंवा अभिनेता बनण्यात रस नाही. त्या वेळी तो म्हणाला होता, 'मला या सगळ्यात त्याला गुंतवायचे आहे, त्याला काही बघायचे नाही, त्याला फक्त त्याचे काम करायचे आहे. त्याला शिक्षण करायचे आहे, इतकंच काय तर त्याला फॅशन डिझायनिंगंमध्ये करियर करायचे आहे.