Leonardo Dipcaprio New Girlfriend: सध्या चर्चा आहे ती म्हणजे लिओनार्डो डायकॅपेरिओ या अभिनेत्याची. सध्या त्याची एका वेगळ्याच कारणासाठी गेली अनेक वर्षे चर्चा रंगताना दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून तो कोणाला डेट करत असल्याची चर्चा रंगलेली आहे. लिओनार्डा हा 48 वर्षांचा आहे. सोबतच ब्रिटिश मॉडेल नीलम गील 28, हिला तो डेट करत होता याची माध्यमांमध्ये चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. महिन्याभरापासून या चर्चा रंगल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिओनार्डो आपल्या आईसोबत एका अतिउच्चभ्रु हॉटेलमध्ये भारतीय वंशाची ब्रिटिश मॉडेल नीलम गील हिच्यासोबत दिसला होता. त्यामुळे तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत आहेत का याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. पुन्हा पुन्हा या चित्रपट पिकायला लागल्यानंतर अखेर सोशल मीडियावरून नीलम गील हिनं सोशल मीडियावर शेअर केलं होतं की, ते दोघं एकमेकांना डेट करत नसून लिओनार्डोच्या खास मित्राला ती डेट करते आहे. तर त्यातून ते अनेकदा त्यामुळेच डिनरला एकत्र जात आहेत. 


परंतु आता लिओनार्डोनं दुसरं प्रेम शोधलंय की काय? अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. यावेळी सध्या त्या दोघांचे काही कॅफेवरील फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्या दोघांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत का? याची जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे ते म्हणजे लिओनार्डोच्या या नव्या गर्लफ्रेंडकडे. यावेळी ते दोघं हे लॉस एन्जेलिसच्या एका कॅफे बाहेर दिसले. Page Six नं त्यांचा फोटो शेअर केला आहे. ज्यात त्यांनी म्हणलंय की, लिओनार्डो डायकॅपिरो आणि इटॅलियन मॉडेल विटोरिया सेरेटी स्पॉट झाले आहे. त्यांच्या हातात आईस्ड कॉफी आणि आईस्क्रीम आहे. लिओनार्डो 48 आहे तर विटोरिया ही 25 आहे. 



हेही वाचा : कोणाला वेडंवाकडं बोलण्याची काय बिशाद? दाक्षिणात्य कलाकारांची एकी पाहून परेश रावल यांनी बॉलिवूडकरांचे टोचले कान



काल 24 ऑगस्ट रोजी त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे त्या दोघांचीच. लिओनार्डानं यावेळी ग्रे रंगाची शॉर्ट्स आणि व्हाईट रंगाचा टीशर्ट घातला आहे. त्यासोबतच त्यानं कॅप आणि सनग्लासेस घातले आहेत. यावेळी त्यानं मास्कही लावला आहे. यावेळी विटोरिया हिनं ब्लॅक रंगाची मिडी आणि त्यावर व्हाईट स्वेटर घातला होता.