Paresh Rawal on Unity in South Indian Film Industry: परेश रावल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. सध्या ते बहुचर्चित 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मध्यंतरी अशी चर्चा होती की बॉलिवूडपेक्षा साऊथ इंडियन चित्रपटांना प्रेक्षक जास्त गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टी ही टेकओव्हर करते आहे का याचीच चर्चा रंगलेली दिसत होती. बॉक्स ऑफिसवर बड्या बॉलिवूड कलाकारांच्या चित्रपटांना एकामागून एक अपयश येताना दिसत होते. त्यामुळे बॉलिवूड कलाकार हे आता फ्लॉप होणार का याचीच चर्चा चर्चा रंगलेली होती. आता बॉलिवूडच्या चित्रपटांना तशी पाहिली तरी नवी संजीवनी मिळते आहे परंतु 'आदिपुरूष' या चित्रपटामुळे संशयाची पाल परत चुकचुकली असून यापुढे बॉलिवूड चित्रपटांचे भविष्य कसे राहील अशाही चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. यावेळी ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी दिलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.
यावेळी त्यांनी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीतील एकीबद्दल भाष्य केले आहे. दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत जेवढी एकी आहे. तेवढी एकी ही हिंदी सिनेचित्रपटसृष्टीत नाही, असं ते यावेळी म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडचा उगावणारा सूर्य हा मावळू लागला आहे. त्यातून यावेळी चर्चा आहे ती म्हणजे झपाट्यानं बॉक्स ऑफिसवर आपटणाऱ्या चित्रपटांची. यावर परेश रावल यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले की, ''कारण आमच्या बॉलिवूडवाल्यांकडे एकी नाहीये. जर यांच्याकडे ती एकी असती तर आज जे आपल्याला पाहायला मिळते आहे ते पाहायला मिळाले नसते. तुमच्या थिएटरमध्ये कोणी दगडही मारू शकत नाही. कुणी गुंडगिरीही करू शकत नाही. म्हणून एकी पाहिजे जी दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत आहे.''
यापुढे ते म्हणाले की, ''साऊथमध्ये तुम्ही कोणाच्या विरूद्ध बोलून दाखवा. कोणीचीही हिम्मत होणार नाही. जे तिथे आहे ते इथे बॉलिवूडमध्ये नाही.'' तसेच ते म्हणाले की, जी प्रादेशिक चित्रपटांची विचार करण्याची पद्धत आहे. ती इथे का नाही?
परेश रावल हे उत्कृष्ट अभिनेते आहेतच परंतु त्याचसोबत ते राजकारणातही सक्रिय आहेत. त्यांची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा असते. यावेळी त्यांचे हे वक्तव्यही चर्चेत आहे.