Orry Awatramani Networth: बॉलिवूडमध्ये सध्या वावडं आहे ते म्हणजे स्टार कीड्सचं. ते कायमच कुठे ना कुठेतरी स्पॉट होताना दिसतात. त्यामुळे त्यांचीही चर्चा सतत रंगत असते. कधी बेस्ट फ्रेंड्ससोबत तर कधी आपल्या कौटुंबिक सोहळ्यात स्पॉट होतात. कधी महागड्या पार्टीत तर कधी महागड्या (Star Kids Parties) रेस्टोरंट्समध्ये. आपल्या आगळ्यावेगळ्या स्टाईलसाठी ती नेहमीच ओळखली जाते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे न्यासा देवगणची. काजोलची ही मुलगी सध्या सगळ्या स्टार कीड्समध्ये प्रसिद्ध आहे. तिच्या हटके स्टाईल्सनं ती कायमच चर्चेत असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे तिची अनेकदा चर्चा होताना दिसते. ती कधी कुठल्या फ्रेंडसोबत स्पॉट होईल याचा काहीच नेम नाही. मध्यंतरी तिचे लंडनमधील काही फोटो हे व्हायरल झाले होते. यावेळी ती एका पार्टीमध्ये दिसली होती. तिच्यासोबत असलेला तिचा बेस्ट फ्रेंण्ड ओरहान अवत्रामणी ज्याला सगळेच ऑरी असं म्हणतात. तोही स्पॉट (Star Kids Spotted) झाला होता. ऑरी हा अनेकदा स्टार कीड्सच्या घोळक्यात दिसत असतो. त्याच्या फॅशनचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. कायमच ऑरी हा ब्रेण्डेड कपडे घालताना दिसतो. त्यामुळे त्यालाही प्रचंड प्रमाणात ट्रोल केले जाते. त्याच्या फॅशनची कायमच चर्चा होताना दिसते. तुम्हाला माहितीये का की ऑरीची नेटवर्थ नक्की किती? 


ऑरी हा कायमच बॉलिवूड सेलिब्रेटींच्या पार्टीमध्ये रंगताना दिसतो. अनन्या पांडे, न्यासा देवगण, राधिका मर्चंट यांच्यासोबत तो अनेकदा फिरताना दिसतो. मध्यंतरी तो राधिका मर्चंटसोबतही स्पॉट झाला होता. त्यावेळी त्यांनी स्काय डायव्हिंग केले होते. ऑरी कायमच महागडे कपडे आणि महागड्या कार्समध्ये फिरताना दिसतो त्यामुळे त्याच्या या एक्झरी लाईफची कायमच चर्चा होताना दिसते. 


हेही वाचा - सलमाननं केलं कतरिनाच्या नवऱ्याला इग्नोर? नक्की काय घडलं... पाहा VIDEO


ऑरी हा गायक आहे. सोबतच तो फॅशन क्षेत्रातही सक्रिय आहेय त्याचसोबत त्याला खेळाचीही आणि कलेचीही आवड आहे. ऑरीनं त्याच्या ऑफिशियल लिंक्डिन प्रोफाईलवर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये स्पेशल प्रोजेक्ट मॅनेजर असं लिहिलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कळते की, त्याच्याकडे 1.7 कोटीची मर्सिडिज कार आहे. त्याचसोबत त्याच्या 45 लाखांचे रॉयलेक्स घड्याळ आहे. तो अनेकदा फंकी कपडे परिधान करताना दिसतो. सोबतच त्याच्याकडे 1.5 लाखांच्यापुढे किंमत असलेली शॉर्ट्स आहे. त्याच्या चप्पलांची किंमतही लाखांच्या वर आहे. 



ऑरी हा सोशल मीडियावरही चांगलाच लोकप्रिय असतो. त्याचेही सोशल मीडियावर चांगलेच फॅन्स आहेत. त्यामुळे अनेकदा लक्झरीयस लाईफ जगणारा हा मुलगा सस्ती चिजों का शौक नहीं रखता हैं!