मुंबई : सैफ अली खान हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. लोकांना त्याचा अभिनय खूप आवडतोय. बॉलीवूड इंडस्ट्रीत सैफला छोटे नवाब म्हणून देखील ओळखलं जातं, याचे कारण म्हणजे सैफ अली खान राजघराण्यातील मुलगा आहे. यामुळेच सैफ आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जीवनशैली खूप राजेशाही आहे. सैफ सतत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैफ अली खान सध्या मुलगी सारा अली खानमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. सारा अली खान ही सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी आहे.सारा अली खान सध्याच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने स्वत:ची एक मोठी ओळख निर्माण केली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग देखील आहे.


सध्या सारा अली खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सारा अली खान बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत आहे. त्यामुळेच तिची सध्या बरीच चर्चा आहे. साराच्या या नात्यामुळे तिचे वडील सैफही सध्या चर्चेत आहेत.


सारा अली खान कोणाला डेट करत आहे हे जाणून घेण्यात नेहमीच तिचे चाहते उत्सुक असतात. तिचे नाव बऱ्याचदा कार्तिक आर्यनसोबत जोडले गेले आहे. पण तिचा लाईफ पार्टनर कार्तिक नसुन आणखी कुणी असल्याची अशी चर्चा रंगते आहे. साराचा हा जवळचा मित्र सहाय्यक दिग्दर्शक आहे. 



सारा अली खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. सारा अली खानने आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण आजकाल ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. कारण आजकाल सारा अली खानच्या बॉयफ्रेंडची माहिती समोर आली आहे ज्याला ती सध्या डेट करत असल्याचं बोललं जात आहे.


चर्चा आहे की, सारा अली खानच्या बॉयफ्रेंडचे नाव जेहान हांडा आहे. सारा अली खान अनेक दिवसांपासून जहांसोबत दिसत आहे. दोघेही एकमेकांना खूप पसंत करतात अशी बातमी आहे. 


केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सारा अली खान आणि जेहान यांची भेट झाली होती. या चित्रपटात जहाँ हा सहाय्यक दिग्दर्शक होता.


दोघांचे रोमॅन्टिक फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुऴे सारा जेहानसोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार का असाही प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे साराचा होणारा नवरा हा कोट्यवधींचा मालक असल्याचं ही समोर आलं आहे. 


या चित्रपटापासून दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत, त्यामुळे सारा अली खान जहांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर, 250 कोटींच्या मालमत्तेचा जेहान हा मालक आहे. पण सारा अली खानने अद्याप जेहानसोबत डेट करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.