Tarla Dalal: हुमा कुरेशीची तरला ही वेबसिरिज सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे सध्या तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. ही वेबसिरिज एक बायोपिक आहे. तरला दलाल यांच्या जीवनावर ही वेबसिरिज आधारित आहे. तरला दलाल या मास्टर शेफ होत्या. 2013 साली त्यांचे निधन झाले परंतु या तरला दलाल नक्की होत्या तरी कोण आणि त्यांच्या आयुष्यात बेतलेली ही वेबसिरिज नक्की आहे तरी काय? आजकाल युट्युबवर आपल्याला अनेक असे व्हिडीओज हे पाहायला मिळतात ज्यात महिला या आपल्या हातानं बनवलेल्या पदार्थांना जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची सध्या चांगलीच क्रेझ आहे. अनेक स्त्रिया या आपलं स्वत:च युट्यूब चॅनल चालवताना दिसत आहेत. त्यांच्या पदार्थांनाही जगभरात ओळख प्राप्त होते आहे. हे डिजिटल युग येण्याआधी ज्यांनी आपले पदार्थ 'डिजिटली' प्रेक्षकांपर्यंत पोहचवले त्याच या तरला दलाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरला दलाल या भारतातील सर्वांत लोकप्रिय मास्टरशेफ आणि कूकबूकच्या म्हणजेच स्वयंपाकावर लिहिणाऱ्या लेखिका होत्या. त्यांचे लिखाणही प्रचंड लोकप्रिय होते. इंडियन ज्युलिया चाईल्ड म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी 17000 भारतीय पदार्थांना जगातील ओळख मिळवून दिली होती. त्यामुळे त्यांनी त्यावेळी प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती. तरला यादेखील एक गृहिणीच होत्या. परंतु आपली स्वयंपाकाची आवड त्यांनी जोपासली आणि त्याचसोबत त्यांनी आपल्या या आवडीला व्यावसायिक रूप दिले आणि या क्षेत्रात कमालीची उंची गाठली. त्यांच्या या क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना पद्मश्री देत गौरविण्यात आलं आहे. इडल्यांपासून ते मॅक्सिन रॅप्सपर्यंत त्यांनी अनेक नानाविध शाकाहरी पदार्थांना ओळख दिली आहे.


कोण होत्या तरला दलाल? 


बेटर इंडियाच्या रिपोर्टनूसार, दलाल यांचा जन्म पुण्यात झाला. 1960 मध्ये तरला यांचे लग्न झाले त्यानंतर त्या पुण्यावरून मुंबईला शिफ्ट झाल्या. त्यांना लहानपणापासूनच स्वयंपाकाची आवड होती. 1966 मध्ये त्यांनी आपल्या स्वयंपाकाच्या आवडीवर भर देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेजाऱ्यांसाठी कुकींग क्लास घेण्याचे ठरविले आणि त्याचसोबत त्यांनी साध्या शाकाहरी पदार्थांपासून ते मेक्सिकन आणि इटालियन पदार्थांपर्यंत स्वयंपाक करायला सुरूवात केली आहे. त्यांच्या या क्लासेसना चांगलीच लोकप्रियता मिळाली. 



पद्मश्री स्विकारताना तरला दलाल आणि पदार्थ बनवताना तरला दलाल (Photo: Twitter)


हेही वाचा - बाहेर बेधुंद पावसाच्या सरी.. अन् घरबसल्या लुटा 'या' Webseries चा आनंद



डावीकडून हुमा कुरेशी तरला दलाल यांच्या भुमिकेत आणि तरला दलाल (Photo: Social Media)


आज त्यांचा मुलगा त्यांचा वारसा सांभाळतो आहे. त्यांच्या वेबसाईटवर (www.tarladalal.com) 17,000 पाककृती आहेत. ज्यात देशातील तसेच परदेशातील आंतरराष्ट्रीय पदार्थांचा समावेश आहे. त्यांचा TDF म्हणजेच तरला दलला फूड्स नावाचा ब्रॅण्डही आला होता. त्यांचा Cook It Up With Tarla Dalal हा शोही लोकप्रिय झाला होता.