एकांतात आकाश ठोसरशी जवळीक साधणारी `ती` कोण?
आकाश लवकरच बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे
मुंबई : अभिनेता आकाश ठोसर लवकरच 'झुंड' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधीच आकाशची जोरदार चर्चा रंगली आहे ती एका फोटोमुळे. आकाश ठोसरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केलाय. जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
आकाश ठोसरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटला एक फोटो पोस्ट केलाय. ज्यामध्ये एक मुलगी आकाशच्या डोक्यांवर हात ठेवून बसलेली दिसत आहे.
हा फोटो सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. ही मुलगी नेमकी कोण? जी आकाशच्या इतक्या जवळ आहे.?कुछ तो गडबड हे दया? ही मुलगी आकाशच्या केसांना तेल लावतेय का?
यासारखे एक ना अनेक प्रश्न आकाशच्या चाहत्यांना पडले आहेत. आकाशने या अगोदरही आपले फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केेलेत. पण ही मुलगी कोण? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे.
महत्वाचं म्हणजे या फोटोत त्या मुलीचा चेहरा क्रॉप केलाय. त्यामुळे ही मुलगी नेमकी कोण? अशी चर्चा सगळीकडे होत आहे.
आकाशने दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आता आकाश लोकप्रिय अभिनेता बनला आहे. असं असताना आकाश लवकरच बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.