मुंबई : बॉलिवूड सध्या राजकारणाच्या रंगात रंगताना दिसत आहे. 5 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशोगाथेवर बेतलेला चित्रपट प्रेक्षकाच्या भेटीस येणार आहे. तर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बाहदूर शास्त्री यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट 'द ताशकंद फाइल्स' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला . मागील काही दिवसांत चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे चित्रपटातील चार प्रमुख भूमिकांवरून पडदा उठवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटात अभिनेता मिथून चक्रवर्ती चित्रपटातील अनेक मुख्य भूमिकेंपैकी एका भूमिकेत झळकणार आहेत. ते या चित्रपटात 'श्याम सुंदर त्रिपाठी' यांचे व्यक्तिमत्व साकारणार आहेत. 




त्याचप्रमाणे अभिनेत्री पल्लवी जोशी, आएशा अली शाह यांच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटात पल्लवी लेखक आणि इतिहास काराच्या भूमिकेत दिसणार आहे.



चित्रपटात श्वेता बासू प्रसादने 'रागिनी फुलें'च्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. 'द ताश्कंद फाइल्स' चित्रपटाच्या माध्यमातून भारताचे चर्चीत आणि दुसरे पंतप्रधान लाल बाहदूर शास्त्री यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यात येणार आहे. लाल बाहदूर शास्त्रींचा मृत्यू ताशकंद मध्ये झाल्यामूळे चित्रपटाचे नाव 'द ताश्कंद फाइल्स' ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 



ऐतिहासीक घटनेवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांचे आहे. तर चित्रपटात नसीरुद्दीन शाह, मिथुन चक्रवर्ती, श्वेता बासु, पंकज त्रिपाठी, विनय पाठक, मंदिरा बेदी, पल्लवी जोशी, अंकुर राठी आणि नाम शुमार अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. 'द ताश्कंद फाइल्स' चित्रपट 12 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.